टीम इंडियाच्या प्रयोगांनी पाकिस्तान अस्वस्थ, पण त्यांना इतकी चिंता का? ते का घाबरले?

| Updated on: Jul 12, 2022 | 11:56 AM

आजपासून वनडे सीरीज सुरु होतेय. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर (IND vs WI) जाणार आहे. एकापाठोपाठ एक सीरीज असल्यामुळे भारतीय संघ अनेक प्रयोग करतोय. अनेक नवीन बदल संघात पहायला मिळतायत.

टीम इंडियाच्या प्रयोगांनी पाकिस्तान अस्वस्थ, पण त्यांना इतकी चिंता का? ते का घाबरले?
Team India
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) संपल्यापासून टीम इंडियाचं (Team India) आंतरराष्ट्रीय वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. भारतीय संघ एकापाठोपाठ एक मालिका खेळतोय. सध्या टीम इंग्लंड मध्ये आहे. टी 20 सीरीज मध्ये भारताने नुकताच विजय मिळवला. आजपासून वनडे सीरीज सुरु होतेय. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर (IND vs WI) जाणार आहे. एकापाठोपाठ एक सीरीज असल्यामुळे भारतीय संघ अनेक प्रयोग करतोय. अनेक नवीन बदल संघात पहायला मिळतायत. युवा खेळाडूंना संघात संधी मिळतेय. फलंदाजीच्या क्रमवारीत सातत्याने बदल केले जात आहेत. टीम मॅनेजमेंटकडून सुरु असलेल्या या बदलांमागे एकमेव उद्दिष्टय आहे, बेंच स्ट्रेंथ मजबूत करणं. भविष्याच्या दृष्टीने संघ बांधणीच्या इराद्याने हे सर्व सुरु आहे. त्यात काही बदल यशस्वी ठरतायत. काहींना यश मिळत नाहीय. भारतीय संघात हे, जे प्रयोग सुरु आहेत, त्यावर पाकिस्तानची बारीक नजर आहे.

भारताच्या प्रयोगावर पाकिस्तानची नजर

टीम इंडियाच्या प्रत्येक प्रयोगावर पाकिस्तान बारीक लक्ष ठेवून आहे. भारतीय संघात काय घडतय? कुठला खेळाडू, कितव्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय, कोण इन, कोण आऊट यावर त्यांची नजर आहे. भारतीय संघातील या बदलांवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वेगवेगळी मत मांडत आहेत.

राशिद लतिफ का बोलतोय?

‘इतक्या जास्त रोटेशन्सनुळे भारत आपली पूर्ण टीमच बिघडवून टाकेल’ असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतिफने म्हटलं आहे. ‘भारताने इतके जास्त प्रयोग केले नसते, तर त्यांनी इंग्लंड विरुद्धची टी 20 सीरीज 3-0 ने जिंकली असती’ असं लतिफचं मत आहे. “ऋषभ पंत मधल्या फळीतला धोकादायक फलंदाज आहे. पण भारतीय संघ व्यवस्थापन त्याला सलामीला पाठवत आहे. टीम इंडियातील 10 पैकी 9 फलंदाज सलामीवीर बनले आहेत” असं राशिद लतिफने आपल्या युट्यूब चॅनलवर उपरोधिकपणे म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानला भीती कसली?

टीम इंडियाने सातत्याने जे रोटेशन्स केले, त्याचा फायदा इंग्लंड विरुद्धच्या टी 20 च्या तिन्ही सामन्यात दिसून आला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप पर्यंत भारतीय संघात असे अनेक बदल दिसतील. त्यातून निश्चित काही चांगलं घडू शकतं, हीच धास्ती राशिद लतिफला आहे.

शाहिद आफ्रिदीकडून कौतुक

जे राशिद लतिफला आवडलं नाही, त्याचं कौतुक शाहिद आफ्रिदीने केलं. इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन टी 20 सामन्यात विजयी आघाडी घेतल्यानंतर शाहिद आफ्रिदीने भारतीय संघाचं कौतुक केलं. भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे, असं त्याने म्हटलं होतं.