दुबई : सेमीफायनलसारख्या (Semi final between Pakistan vs Australia) अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. अगदी हाता-तोंडाशी आलेला सामना पाकिस्तानने गमावला आहे. विशेष म्हणजे या पराभवात एक षटक पाकिस्तानला महाग पडलं आहे. हे षटकं म्हणजे पाकिस्तानकडून टाकण्यात आलेलं 19 वं षटक. जे त्यांचा ‘स्टार’ गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) टाकलं. शाहीनने या एका षटकात तब्बल 22 धावा देत सामना गमावला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध सामन्यात विजयानंतर गर्वाच्या घरात राहणारा शाहीन आता जमिनीवर आला असावा.
सामन्यात पाकिस्तानने आधी 176 धावा केल्या ज्या पूर्ण करुन विजयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात आला. वॉर्नरशिवाय वरची फळी सर्व पटापट बाद झाली. ज्यानंतर स्टॉयनिस आणि वेड यांनी अखेरच्या काही षटकात सामना जिंकवून दिला. पण तरी देखील 18 षटकानंतरही सामना पाककडेच होता. शेवटच्या 12 चेंडूत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 22 धावांची गरज होती. ज्यावेळी शाहीन गोलंदाजीला आला. सुरुवातीचे काही चेंडू ठिक गेल्यानंतर अखेरच्या 3 चेंडूवर मात्र मॅथ्यू वेडने दमदार षटकार ठोकत सामना एक ओव्हर राखून ऑस्ट्रेलियाला जिंकवून दिला. यावेळी हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल सोडला देखील पण तरी त्यानंतरच्या सर्व चेंडू शाहीनला सिक्स खावे लागल्याने पाकचा पराभव झाला.
आफ्रिदीने भारताविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाचे 3 विकेट्स घेतले होते. सर्वात आधी शून्य धावांवर खेळणाऱ्या रोहितला, पाठोपाठ 3 धावांवर खेळणाऱ्या केएल राहुलला आणि अखेर विराटला बाद करत महत्त्वाचे विकेट आफ्रिदीने टीपले. त्यानंतर आता शाहीनने एका विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय फलंदाजांची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओही समोर आला होता. या व्हिडीओमध्ये सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या शाहीनला पाकिस्तानी फॅन्स विराट, रोहित कसे बाद झाले असं मिश्किलपणे विचारत आहेत. तेव्हा शाहीन नकल करत ते कसे बाद झाले हे दाखवत आहे. हा व्हिडीओ बराच व्हायरल देखील झाला होता. पण आता या पराभवानंतर याच व्हिडीओतील फोटो टाकून नेटकरी शाहीनला ट्रोल करत आहेत.
Shaheen Afridi showing crowd how Mathew Wade fucked him with 3 match winning Sixes. #PAKVSAUS pic.twitter.com/OBpM3KkYMl
— NIRAV?? (@Niiiravpatel) November 11, 2021
सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर पाकचे सलामीवीर बाबर आणि रिजवान यांनी चांगली सुरुवात केली. 70 हून अधिक धावांची भागिदारी होताच, बाबर 39 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर रिजवान आणि फखरनं डाव सांभाळला. पाकला सामन्यात मोहम्मद रिजवानच्या अर्धशतकाने चांगली सुरुवात करु दिली. पण खरी फिनिशींग फखरच्या अर्धशतकानेच दिली. विशेष म्हणजे फखरचं अर्धशतक हे तुफानी ठरलं कारण पहिल्या 17 चेंडूत त्याने केवळ 17 रन केले. पण अखेरच्या काही षटकात त्याने गिअर वाढवत तुफान खेळी केली. मिचेल स्टार्कच्या 2 ओव्हरमध्ये तीन षटकार ठोकत 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. शेवटच्या 15 चेंडूत फखरने 38 धावा केल्या. रिजवानने 52 चेंडूत 67 धावांची तर फखर जमानने 32 चेंडूत 55 धावांची खेळी केली. ज्याच्या जोरावर पाकने 176 धावांपर्यंत मजल मारली.
177 धावांचे खमके आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार शून्यावर बाद झाला. ज्यानंतर वॉर्नर आणि मार्शने सामना सांभाळण्याचा प्रय्तन केला पण मार्श 28 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर स्मिथ, मॅक्सेव 5,7 धावा करुन बाद झाले. त्याच काही ओव्हर्समध्ये सामना सांभाळणारा वॉर्नरी 49 धावा करुन बाद झाला. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर मात्र क्रिजवर आलेल्या मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 5 गडी आणि एक ओव्हर राखून विजय मिळवून दिला. शाहीन आफ्रिदीच्या 19 व्या षटकात वेडने लागोपाठ 3 सिक्स मारुन सामना जिंकवला. यावेळी मार्कसने नाबाद 40 आणि मॅथ्यूने नाबाद 41 धावांची खेळी केली.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहम्मद रिजवानचं अर्धशतक, 1000 धावा करत रचला इतिहास
(Pakistan lost match against Australia due to Shaheen Afridis bad over)