मुंबई: T20 वर्ल्ड कप 2022 साठी कुठल्याही क्षणी पाकिस्तानी टीमची घोषणा होऊ शकते. आशिया कपमधील कामगिरी पाहिल्यानंतर पाकिस्तानी टीममध्ये काही बदल होऊ शकतात. काहींसाठी हे हैराण करणारे बदल असू शकतात. पाकिस्तानी टीममधून तीन प्लेयर्सना डच्चू मिळू शकतो. ज्यांनी अपेक्षेनुसार आशिया कपमध्ये प्रदर्शन केलेलं नाही.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्नुसार, पाकिस्तानी थिंक टँक टीममध्ये अनेक बदल करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तानच्या मधल्याफळीला सर्वात जास्त फटका बसू शकतो. मीडिल ऑर्डरच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. हे पाकिस्तानच्या आशिया कपमधील पराभवाचं एक कारण आहे. पाकिस्तानचे तीन खेळाडू टी 20 वर्ल्ड कपला मुकू शकतात.
यात पहिलं नाव इफ्तिखार अहमदच आहे. तो पाकिस्तानी टीमचा भाग आहे. आशिया कप 2022 मध्ये इफ्तिखार अहमद 6 मॅच खेळला. यात पाच इनिंगमध्ये त्याने 106 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट केवळ 100.96 चा होता. हा स्ट्राइक रेट टी 20 फॉर्मेटला शोभणारा नाहीय.
खुशदिल शाहला सुद्धा पाकिस्तानी टीममधून डच्चू मिळू शकतो. पाकिस्तानी मीडियाने इफ्तिखार सोबत खुशदिलला संघातून ड्रॉप करण्याची माहिती दिलीय. खुशदिलने 6 मॅचमध्ये 6 डावात 58 धावा केल्या. याची सरासरी थोडी जास्त होती. खुशदिलची अडचण सुद्धा स्ट्राइक रेट आहे.
या यादीत तिसरं नाव आसिफ अलीच असू शकतं. आशिया कप 2022 आधी दररोज 150 षटकार नेटमध्ये मारण्याचा दावा त्याने केला होता. प्रत्यक्ष आशिया कपमध्ये त्याने फक्त 3 सिक्स मारले. इतकचं नाही, 6 सामन्यात 5 इनिंगमध्ये फक्त 41 धावा केल्या. आसिफ अलीचा स्ट्राइक रेट 160 च्या वर आहे. पण पाकिस्तानची टीम मॅनेजमेंट आसिफ अलीला पर्याय शोधत असल्याची माहिती आहे.