लाहोर : बाबर आजम सध्या ऑस्ट्रेलियात आहे. इथे कराचीत त्याचे काका इफ्तिखार अहमद यांची जोरदार धुलाई झाली. इफ्तिखार सुद्धा बाबर सारखेच पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळतात. फक्त बाबरच नाही, पाकिस्तानी टीममधील अन्य खेळाडू सुद्धा इफ्तिखार अहमद यांना ‘चाचा’ म्हणूनच बोलावतात. बाबर आजम त्यांना ‘काका’ म्हणून हाक मारतो, तस इफ्तिखार अहमद सुद्धा बाबरला भाचा म्हणून संबोधतात. आता मुद्यावर येऊया. कराचीमध्ये इफ्तिखार अहमदची जोरदार धुलाई झाली. क्रिकेटच्या मैदानावर ही धुलाई झाली.
पाकिस्तानात सुरु असलेला नॅशनल T20 कप शेवटच्या टप्प्यात आहे. 9 डिसेंबरला या टुर्नामेंटमधील पहिला सेमीफायनल सामना खेळला गेला. यात इफ्तिखार अहमदच्या पेशावर रिजन टीमचा सामना यासिर शाहच्या एबोटाबाद टीम विरुद्ध होता. इफ्तिखार अहमदच्या कॅप्टनशिपखाली खेळणाऱ्या पेशावरने पहिली बॅटिंग केली. त्यांनी एबोटाबाद टीमला विजयासाठी 170 धावांच टार्गेट दिलं.
पहिल्याच ओव्हरमध्ये धुतलं
आता तुम्ही म्हणाला बाबर आजम ज्याला चाचा म्हणून बोलावतो, त्याची धुलाई कधी झाली?. चाचाची साधीसुधी धुलाई झाली नाही, गोलंदाजी अशी फोडून काढली की, मॅचच मूमेंटम एबोटाबाद टीमच्या बाजूने शिफ्ट झालं. इफ्तिखार आपली पहिली ओव्हर टाकत होता. त्यावेळी एबोटाबादचे दोन फलंदाज खासकरुन सज्जाद अलीने हल्ला चढवला. पहिल्या चेंडूपासून सुरु केलेली धुलाई शेवटपर्यंत कायम होती.
Raining 6️⃣s in Karachi! 🔥@FakharZamanLive and Sajjad Ali Jnr are putting on a terrific show in the semi-final 💪#NationalT20 | #PSHvABT | #AajaMaidanMein pic.twitter.com/vwPbNPgy4x
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 9, 2023
एका ओव्हरमध्ये लिहिली पराभवाची स्क्रिप्ट
इफ्तिखार अहमदने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 29 धावा दिल्या. एबोटाबादची धावसंख्या झटपट 100 पर्यंत पोहोचली. त्याच्या एका ओव्हरमध्ये 4 सिक्स मारले. जेव्हा टीमच्या सेनापतीची अशी अवस्था असेल, तेव्हा अन्य खेळाडूंवर त्याचा परिणाम होणं स्वाभाविक आहे. सहाजिक मॅचचा निकाल पेशावरच्या विरोधात गेला. पहिली सेमीफायनल खेळणाऱ्या पेशावर टीमचा पराभव झाला. नॅशनल T20 कपमधील त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. विजयासह एबोटाबादची टीम फायनलमध्ये पोहोचली.