PAK vs ZIM: मिस्टर बीनवरुन राडा, पाकिस्तानच्या पंतप्रधानांच झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांना प्रत्युत्तर

| Updated on: Oct 28, 2022 | 5:35 PM

PAK vs ZIM: झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांना शहबाज शरीफ यांनी शुभेच्छा दिल्या, पण....

PAK vs ZIM: मिस्टर बीनवरुन राडा, पाकिस्तानच्या पंतप्रधानांच झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांना प्रत्युत्तर
pak vs zim
Image Credit source: Twitter
Follow us on

पर्थ: टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच खराब प्रदर्शन कायम आहे. पाकिस्तानची टीम अजून विजयाच खात उघडू शकलेली नाही. पहिल्या मॅचमध्ये भारताने तर दुसऱ्या मॅचमध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवलं. या पराभवामुळे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. या पराभवानंतर ‘मिस्टर बीन’ चर्चेत आला आहे.

शहबाज शरीफ यांना ते खूपच झोंबलं

पाकिस्तानला हरवल्यानंतर झिम्बाब्वेचे राष्ट्रपती एमर्सन मनांगाग्वा यांनी पाकिस्तानला मीस्टर बीनची आठवण करुन दिली. पुढच्यावेळी खराखुरा मीस्टर बीन पाठवा असं सुद्धा त्यांनी टि्वटमध्ये लिहिलं होतं. एमर्सन मनांगाग्वा यांनी झिम्बाब्वे टीमला सुद्धा विजयाच्या शुभेच्छा दिल्या. मीस्टर बीनचा उल्लेख पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना खूपच झोंबला. त्यांनी प्रत्युत्तर दिलय.

झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष टि्वटमध्ये काय म्हणाले?

“झिम्बाब्वेने शानदार विजय मिळवला. Chevrons ना यासाठी शुभेच्छा. पुढच्यावेळी खराखुरा मिस्टर बीन पाठवा” राष्ट्राध्यक्ष एमर्सन मनांगाग्वा यांनी या टि्वटमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान हा हॅशटॅगही टाकला.

शुभेच्छा देतानाची टोमणा

या टि्वटवर पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी टि्वट करुन प्रत्युत्तर दिलं. “आमच्याकडे खराखुरा मीस्टर बीन नाही. पण खेळ भावना आहे. आम्हा पाकिस्तान्यांना उसळी घेऊन पुनरागमनाची सवय आहे. मिस्टर राष्ट्राध्यक्ष तुम्हाला शुभेच्छा. तुमची टीम आज शानदार खेळली” असं शहाबाज शरीफ यांनी त्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

अखेरीस त्याची भविष्यवाणी खरी ठरली

झिम्बाब्वे विरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानने प्रॅक्टिसचे काही फोटो शेयर केले होते. त्यावर झिम्बाब्वेच्या एक चाहत्याने कमेंट केली. तुम्ही एकदा खोटा मीस्टर बीन पाठवला होता. त्यासाठी तुम्हाला कधी माफ करणार नाही. हा मॅटर मैदानावर पाहू. तुम्हाला पाऊसच वाचवेल, त्यामुळे प्रार्थना करा, पाऊस पडू नये.

या टि्वटनंतर मीस्टर बीनचा वाद चर्चेत आला. आधी झिम्बाब्वेच्या फॅनला ट्रोल करण्यात आलं. अखेरीस त्याची भविष्यवाणी खरी ठरली. पाकिस्तानचा पराभव झाला.