लाहोर: टीम इंडियाचा आज टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये दारुण पराभव झाला. इंग्लंडने टीम इंडियावर 10 विकेटने विजय मिळवला. विजसाठी दिलेलं 169 धावांच टार्गेट 16 व्या ओव्हरमध्येच पार केलं. जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांनी 170 धावांची रेकॉर्ड भागीदारी केली. या पराभवामुळे अनेक क्रिकेटप्रेमींच भारत-पाकिस्तान फायनल सामना पाहण्याच स्वप्न भंगलं.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र खूप आनंद
या पराभवामुळे टीम इंडियाचे जगभरातील चाहते निराश झालेत. पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र खूप आनंद झाल्याच दिसतय. त्यांनी केलेल्या टि्वटवरुन हे दिसून आलं. टीम इंडियाच्या पराभवानंतर त्यांनी एक डिवचणार टि्वट केलं. त्यामुळे भारतीय चाहते मात्र चांगलेच खवळलेत.
So, this Sunday, it’s:
152/0 vs 170/0
?? ?? #T20WorldCup
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) November 10, 2022
त्या पार्टनरशिपची आठवण करुन दिली
टी 20 वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाचा 10 विकेटने इतका मोठा पराभव झालाय. मागच्यावर्षी दुबईत टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला होता. त्यावेळी बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान यांनी नाबाद 152 धावांची भागीदारी केली होती. आज अशीच कामगिरी जोस बटलर आणि एलेक्स हेल्सने केली. त्यांनी नाबाद 170 धावांची भागीदारी केली.
टि्वट चोरल्याचा आरोप
पाकिस्तानी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी त्याच पाकिस्तानच्या विजयाची आठवण करुन दिली. त्यांच्या या टि्वटवर लोक भडकले. त्यांना चांगलच सुनावलं. एका फॅनने त्यांच्यावर आपलं टि्वट चोरल्याचा आरोप केला. कमीत कमी आपल्या पदाची प्रतिष्ठा लक्षात घ्यावी, असं एका युजरने म्हटलं आहे.