IPL 2023 LSG News : केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सच्या टीमने मागच्या सीजनमध्ये आयपीएल डेब्यु केला होता. टीमने पहिल्या सीजनमध्ये चांगला खेळ दाखवला. पण ते फायनलमध्ये प्रवेश करु शकले नाहीत. यावेळी फायनलमध्ये पोहोचण्याच्या इराद्याने लखनौची टीम मैदानात उतरेल. बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल यांच्यावर लखनौ टीमला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी आहे. लखनौ टीमला बॉलिंगचे धडे दिल्यानंतर ते थेट पाकिस्तानला रवाना होतील.
पाकिस्तान क्रिकेट टीम बऱ्याच महिन्यांपासून कोचिंग स्टाफ नियुक्तीच्या प्रोसेसमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी माजी कोच मिकी आर्थर यांना ऑनलाइन कोच बनवलं होतं. पण आता वर्ल्ड कप डोळ्यासमोर असल्याने पाकिस्तानला कायमस्वरुपी कोचिंग स्टाफ हवा आहे. यासाठी त्यांनी ज्या लोकांना निवडलय, त्यात लखनौ सुपर जायंट्सचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल सुद्धा आहेत. अँड्रयू पट्टिक यांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे.
महिला टी 20 टीमचे कोच
पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज आणि लखनौ टीमचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल यांना बॉलिंग कोच बनवण्याचा निर्णय घेतलाय. मॉर्केल न्यूझीलंडच्या महिला टी 20 टीमचे सुद्धा कोच होते. मार्केल याआधी मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्ड कप दरम्यान नामीबियाच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. S 20 लीगमध्ये ते डरबन टीमचे बॉलिंग कोच आहेत.
पाकिस्तानची बॅटिंग सुधारण्यासाठी काम करणार
मार्केल यांच्याशिवाय पट्टिक यांची निवड करण्यात आली आहे. ते पाकिस्तानी टीमसाठी बॅटिंग कोच म्हणून काम करतील. पट्टिक दक्षिण आफ्रिकेच्या महिला टीमचे कोच होते. आपल्या देशाच्या ए टीमचे ते सहाय्यक कोच सुद्धा होते. आता ते बाबर आजम आणि कंपनीची बॅटिंग सुधारण्यासाठी काम करतील.
पाकिस्तानचे मुख्य कोच कोण?
या दोघांशिवाय पीसीबीने न्यूझीलंडचे माजी ऑलराऊंडर ग्रांट ब्रॅडबर्न यांना मुख्य कोच बनवण्याचा निर्णय घेतलाय. ते आधी फिल्डिंग कोच होते. त्यांच्यावर युवा पाकिस्तानी क्रिकेटर्सना ट्रेन करण्याची जबाबदारी होती. त्यांनी पाकिस्तानच्या नॅशनल अकादमीत काम केलय.