लाहोर: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर मोहम्मद रिजवान T20 वर्ल्ड कप संपल्यानंतर मायदेशी परतलाय. जगातील टॉप फलंदाजांमध्ये मोहम्मद रिजवानचा समावेश होतो. पाकिस्तानात त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. रिजवानच आपल्या चाहत्यांबरोबर एक खास नातं आहे. तो कधी आपल्या फॅन्सना निराश करत नाही. खूप आदराने त्यांना भेटतो, बोलतो. आता रिजवानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात पाकिस्तानच्या ओपनरने एका महिला फॅनच मन मोडलं. तिची एक छोटीशी इच्छा पूर्ण केली नाही.
रिजवानच्या कृतीने सगळेच हैराण
रिजवान कुठल्यातरी इव्हेंटसाठी गेला होता. इव्हेंट सपल्यानंतर नेहमीप्रमाणे फॅन्सनी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. रिजवानने तिथे उपस्थित असलेल्या पुरुष फॅन्सच्या जवळ जाऊन फोटो काढले. त्यावेळी तो खूप सहज वाटला. एक महिला फॅन रिजवानजवळ पोहोचली. त्यावेळी रिजवानच्या कृतीने सगळ्यांनाच हैराण केलं.
Mohammad Rizwan refuses to give selfie to a female fan.#Cricket | #Pakistan | #MohammadRizwan | #T20WorldCup | #Fan pic.twitter.com/0ANQWoB8Gn
— Khel Shel (@khelshel) November 15, 2022
रिजवानने महिला फॅनच मोडलं मन
महिला फॅनला रिजवानसोबत सेल्फी काढायचा होता. ती फोन घेऊन रिजवानजवळ पोहोचली. मुलगी जवळ येत असल्याच पाहून रिजवान घाबरला. तो मागे गेला. त्याने महिला फॅनसोबत सेल्फी काढण्यास नकार दिला. रिजवानने शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या फॅनजवळ जाऊन त्याच्यासोबत सेल्फी काढला. रिजवानच्या या कृतीने महिला फॅन निराश झाली. तिच मन मोडलं. निराश नजरेने ती रिजवानकडे पाहत होती. रिजवान आपल्यासोबत फोटो काढेल, अशी तिची अपेक्षा होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.