लाहोर : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंडचे अनेक खेळाडू सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतायत. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर बेन कटिंग पीएसएलमुळे सध्या पाकिस्तानात आहे. फक्त कटिंगच नाही त्याची बायको सुद्धा लीगमध्ये बिझी आहे. कटिंगची बायको एरिन हॉलंड प्रेजेंटर आहे. लीगच्या बिझी शेड्यूल दरम्यान एरिन आणि कटिंग परस्परांसाठी वेळ काढतायत. एरिनने या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यात ती आपला नवरा कटिंगला किस करताना दिसली.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एरिन आणि कटिंगपेक्षा पाकिस्तानी दिगगज शोएब मलिकची जास्त चर्चा आहे. कटिंग समोर दिसताच एरिनने त्याला किस केलं. एरिन कटिंगला किस करत होती, तितक्यात तिथे शोएब मलिक आला व त्यांच्याशी बोलू लागला.
10 मिनिट गळाभेटीची गरज
“आठवडे, महिने जगात कुठेही असलो, तरी तू सोबत असलास की, घरासारखं वाटतं” असं एरिनने व्हिडिओ शेअर करताना कटिंगबद्दल लिहिलय. शोएब मलिकशी सहमत आहे, त्यासाठी 10 मिनिटं गळाभेटीची गरज आहे. कटिंग आणि शोएब मलिक लीगमध्ये कराची किंग्सकडून खेळतायत. मागच्या सामन्यात त्यांच्या टीमचा मुल्तान सुल्तानने 3 धावांनी पराभव केला.
कटिंग खराब फॉर्ममध्ये
कटिंग लीगमध्ये अजून खास कमाल दाखवू शकलेला नाही. 3 मॅचमध्ये त्याने एकूण 41 धावा केल्या आहेत. त्याशिवाय 3 विकेट घेतलेत. शोएब मलिकने कराचीकडून खेळताना 5 मॅचमध्ये 2 अर्धशतकं झळकावली आहेत.
त्याशिवाय एक विकेटही काढलाय. कराचीच्या टीमने लीगमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळलेत. यात फक्त 1 सामना जिंकलाय. 2 पॉइंट्ससह 6 टीम्सच्या या लीगमध्ये कराचीची टीम 5 व्या स्थानावर आहे.