PSL 2023 : पाकिस्तान सुपर लीग 2023 मध्ये दरदिवशी काही ना काही वेगळं दृश्य पहायला मिळतय. ही लीग चर्चेमध्ये आहे. पण क्रिकेटमुळे नाही, तर दुसऱ्या कारणांमुळे. कधी कॅमेऱ्यासमोर, कोणी टीममधील खेळाडूचा गाल खेचून पळतो, तर कधी भर मैदानात कॉमेंटेटर खेळाडूच्या पत्नीला उचलून घेऊन गोल-गोल फिरवतो. या लीगमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन कटिंग पेक्षा त्याची बायको एरिन हॉलेंडची चर्चा आहे. कटिंग पीएसएल लीगमध्ये कराची किंग्सकडून खेळतोय. त्याची बायको एरिन लीगमध्ये प्रेजेंटर आहे. कटिंगच्या बायकोने या लीगशी संबंधित एक व्हिडिओ टि्वट केलाय. सामना सुरु होण्याआधीचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये कॉमेंटेटर डॅनी मॉरिसनने कॅमेऱ्यासमोर एरिनला उचलून घेतलं व गोल-गोल फिरवलं.
किसमुळेही चर्चेत
एरिन आणि मॉरिसनचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. एरिनने व्हिडिओ शेअर करताना मॉरिसनला अंकल म्हटलय. काही दिवसांपूर्वी एरिन आणि कटिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ती तिचा नवरा कटिंगला किस करताना दिसली होती.
Love ya uncle @SteelyDan66 ? @thePSLt20 pic.twitter.com/9reSq6ekdN
— Erin Holland (@erinvholland) March 5, 2023
या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकची चर्चा झाली होती. एरिन कटिंगला किस करताना शोएब मलिकमध्ये आला होता.
कटिंगची कामगिरी कशी आहे?
पाकिस्तान सुपर लीगमध्ये बेन कटिंगचा खराब फॉर्म सुरु आहे. त्यामुळे मागच्या सामन्यात त्याला बाहेर बसवण्यात आलं. कराचीसाठी तो टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळलाय. यात त्याने सर्वाधिक 20 धावा केल्या आहेत.