PAK vs NZ: ‘या’ चूकांमुळे न्यूझीलंडच वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच स्वप्न भंगलं

| Updated on: Nov 09, 2022 | 6:21 PM

PAK vs NZ: न्यूझीलंडने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये शानदार खेळ दाखवला, पण आज कुठे चुकले?

PAK vs NZ: या चूकांमुळे न्यूझीलंडच वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच स्वप्न भंगलं
Pak vs Nz
Image Credit source: icc
Follow us on

सिडनी: न्यूझीलंडने आयसीसी टी 20 वर्ल्ड कपची दमदार सुरुवात केली होती. त्यांनी सुपर-12 राऊंडच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया सारख्या मजबूत टीमवर विजय मिळवला होता. अशाच कामगिरीच्या बळावर मागच्यावेळचा हा उपविजेता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. पण इथे ते कमाल दाखवू शकले नाहीत. न्यूझीलंडने कुठल्या चूकांमुळे हा सामना गमावला ते जाणून घ्या.

ते दोघे फेल

न्यूझीलंडने या मॅचमध्ये पहिली फलंदाजी निवडली. पण टीमला चांगली सुरुवात मिळू शकली नाही. फिन एलन लवकर आऊट झाला. डेवन कॉन्वे सुद्धा वेगाने धावा फटकावू शकला नाही. सहा ओव्हरमध्ये टीमच्या फक्त 38 धावा झाल्या.

विलियम्सन लवकर मैदानात उतरला

कॅप्टन केन विलियम्सनला लवकर मैदानात उतराव लागलं. तो 17 व्या ओव्हरपर्यंत मैदानात होता. पण तो टी 20 ला साजेशी इनिंग खेळू शकला नाही. त्याने 42 चेंडूत फक्त 46 धावा केल्या.

खराब फिल्डंग

खराब फिल्डिंगही टीमच्या पराभवाच कारण ठरली. पहिल्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर डेवन कॉन्वेने बाबर आजमचा सोपा झेल सोडला. त्याशिवाय ईश सोढीने बाबरला रनआऊट करण्याची संधी सोडली. 16 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर टिम साऊदीच्या गोलंदाजीवर मिचेल सँटनरने मोहम्मद हॅरिसची कॅच सोडली.

आजचा दिवस न्यूझीलंडचा नव्हता

न्यूझीलंडचे गोलंदाज शानदार आहेत. पण या मॅचमध्ये ते कमाल दाखवू शकले नाहीत. ते विकेट काढू शकले नाहीत तसेच धावा सुद्धा रोखता आल्या नाहीत. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना या मॅचमध्ये शेवटपर्यंत लय सापडली नाही. बाबर आजम आणि मोहम्मद रिजवानच्या जोडीने सुरुवातीपासून दबाव ठेवला.