लाहोर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या (Pakistan vs Australia Third Test) वेगवान गोलंदाजांनी काही अप्रतिम स्पेल्स टाकले. त्यांच्या भेदक गोलंदाजीचा सामना करणं, ऑस्ट्रेलियन फलंदाजांनाही जमत नव्हतं. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियात मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि नसीम शाहने (Naseem Shah) अप्रतिम गोलंदाजी केली. त्यांनी घेतलेल्या विकेट पाहिल्या की, या गोलंदाजांच्या टॅलेंटची कल्पना येते. आज कसोटीच्या दुसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 391 धावांवर आटोपला. शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह दोघांनी प्रत्येकी चार-चार विकेट घेतल्या. पाकिस्तानात नेहमीच दर्जेदार वेगवान गोलंदाज तयार झाले आहेत. त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली.
इन स्विंगरच ग्रीनकडे कुठलंही उत्तर नव्हतं
आज सामन्याच्या 125 व्या षटकात नसीम शाहच्या अप्रतिम इन स्विंगरने कॅमरुन ग्रीनचा खेळ संपवला. त्याने टाकलेल्या इन स्विंगरच ग्रीनकडे कुठलंही उत्तर नव्हतं. नसीम शाहने थेट ग्रीनच्या दांड्या गुल केल्या. 79 धावांची दमदार खेळी करणाऱ्या ग्रीनला पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं.
.@iNaseemShah breathes fire down the track ?
And finally gets his man! #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/xD9WpiHfms— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 22, 2022
नसीम शाहने टाकलेला चेंडू खूपच सुंदर होता. ग्रीन बरोबरच नसीम शाहने स्टीव्ह स्मिथलाही बाद केलं. ट्रेव्हिस हेड आणि नॅथन लायनही त्याचेच शिकार होते. 31 षटकात 58 धावा देत त्याने चार विकेट घेतले.
?Too hot to handle ?
It’s @iNaseemShah again.#BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/Kt65DV4Xdt— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 22, 2022
सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजा आणि ग्रीन अनुक्रमे 91 आणि 79 धावांची खेळी खेळले. तीन कसोटी सामन्यांची मालिका सध्या 0-0 अशा स्थितीमध्ये आहे.