पाकिस्तानने 138 धावांच्या छोट्या लक्ष्याचा बचाव करताना जबरदस्त गोलंदाजी केली. इंग्लंडला सहजासहजी विजय मिळू दिला नाही. पाकिस्तानच्या अजून 10-15 धावा जास्त असत्या तर कदाचित निकाल वेगळा दिसला असता. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. याच मेलबर्नच्या मैदानात 1992 साली पाकिस्तानने इंग्लंडला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. आज त्याच पराभवाची इंग्लंडने परतफेड केली. इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली. तो शेवटपर्यंत विकेटवर उभा राहिला. त्याने 49 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. इंग्लंडने पाच विकेटने वर्ल्ड कप जिंकला.
England produced a brilliant all-round performance to win the #T20WorldCup title ?
They were #InItToWinIt at the MCG ?@royalstaglil | #T20WorldCupFinal pic.twitter.com/A8BvZRv5dA
— ICC (@ICC) November 13, 2022
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: पाकिस्तानने 138 धावांच्या छोट्या लक्ष्याचा बचाव करताना जबरदस्त गोलंदाजी केली. इंग्लंडला सहजासहजी विजय मिळू दिला नाही. पाकिस्तानच्या अजून 10-15 धावा जास्त असत्या तर कदाचित निकाल वेगळा दिसला असता. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. याच मेलबर्नच्या मैदानात 1992 साली पाकिस्तानने इंग्लंडला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. आज त्याच पराभवाची इंग्लंडने परतफेड केली. इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली. तो शेवटपर्यंत विकेटवर उभा राहिला. त्याने 49 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. इंग्लंडने पाच विकेटने वर्ल्ड कप जिंकला.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: इंग्लंडला विजयासाठी 18 चेंडूत 12 धावांची गरज आहे. त्यांची 126/4 अशी स्थिती आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 16 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडच्या चार बाद 110 धावा झाल्या आहेत.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 16 ओव्हरचा पहिला चेंडू टाकल्यानंतर दुखापतीमुळे शाहीन शाह आफ्रिदी मैदानाबाहेर गेला. आता इफ्तिखार अहमद त्याची ओव्हर पूर्ण करतोय.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडच्या चार बाद 97 धावा झाल्या आहेत. बेन स्टोक्स (28) आणि मोइन अलीची (3) जोडी मैदानात आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 14 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इंग्लंडच्या चार बाद 89 धावा झाल्या आहेत. बेन स्टोक्स आणि मोइन अलीची जोडी मैदानात आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: पाकिस्तानी बॉलर्स चांगली गोलंदाजी करतायत. हॅरी ब्रुक 20 धावांवर आऊट झाला. त्याने एक चौकार लगावला. 12.3 ओव्हर्समध्ये इंग्लंडची स्थिती 84/4 आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 12 ओव्हर्सनंतर इंग्लंडची 82/3 अशी स्थिती आहे. बेन स्टोक्स 18 आणि हॅरी ब्रुक 20 धावांवर खेळतोय.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 10 ओव्हर्सनंतर इंग्लंड डकवर्थ लुईस नियमानुसार 13 धावांनी पुढे. इंग्लंडची 77/3 अशी स्थिती आहे. बेन स्टोक्स 17 आणि हॅरी ब्रुक 14 धावांवर खेळतोय. आता पावसामुळे सामना झाला नाही, तर इंग्लंड विजयी घोषित होईल.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: शादाब खानने सातवी ओव्हर टाकली. इंग्लंडच्या 3 बाद 54 धावा झाल्या आहेत. बेन स्टोक्स-हॅरी ब्रूकची जोडी मैदानात आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: पाकिस्तानला इंग्लंडची मोठी विकेट मिळाली आहे. जोस बटलर 26 रन्सवर हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर आऊट झाला. त्याने विकेटकीपर रिझवानकडे सोपा झेल दिला. 17 चेंडूत 26 धावा करताना 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. पावरप्ले संपला असून 6 ओव्हर्सनंतर इंग्लंडची स्थिती 49/3 आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: फिल सॉल्टच्या रुपाने इंग्लंडची दुसरी विकेट गेली आहे. हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर त्याने इफ्तिखार अहमदकडे झेल दिला. 9 चेंडूत त्याने 10 धावा केल्या. यात दोन चौकार होते. चार ओव्हरमध्ये इंग्लंडची 32/2 अशी स्थिती आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: भारताविरुद्ध दमदार फलंदाजी करणारा एलेक्स हेल्स अवघ्या 1 रन्सवर आऊट झाला. शाहीन शाह आफ्रिदीने त्याला क्लीन बोल्ड केलं. 3 ओव्हर नंतर इंग्लंडच्या एक बाद 28 धावा झाल्या आहेत. कॅप्टन जोस बटलर (20) आणि फिल सॉल्टची (6) जोडी मैदानात आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. पाकिस्तानच्या कुठल्याही फलंदाजाला मोकळेपणाने फलंदाजी करु दिली नाही. 20 ओव्हरअखेरीस पाकिस्तानच्या 8 बाद 137 धावा झाल्या आहे. पाकिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी 138 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडकून आदिल राशिद, सॅम करन यशस्वी गोलंदाज ठरले. करनने 3, राशिदने 2 विकेट काढल्या. बेन स्टोक्सने एक आणि ख्रिस जॉर्डनने दोन विकेट काढल्या. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या. त्यानंतर बाबर आजमने 32 धावा केल्या.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: पाकिस्तानची सहावी विकेट गेली आहे. शादाब खान (20) रन्सवर जॉर्डनच्या गोलंदाजीवर वोक्सकरवी झेलबाद झाला. शादाब खानकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता होती. त्यामुळे पाकिस्तानसाठी झटका आहे. 18 ओव्हर अखेरीस पाकिस्तानची 127/6 स्थिती आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: शान मसूद OUT झाला आहे. इंग्लंडला पाचवा धक्का बसला आहे. 17 ओव्हर अखेरीस पाकिस्तानची धावसंख्या पाच बाद 122 आहे. शान मसूदला (38) सॅम करनने लिव्हिगस्टोनकरवी झेलबाद केलं.
Marathi News LIVE Update
विम्यांचा दाव्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक नाही
कोणतीही विमा कंपनी केवळ पीयूसी प्रमाणपत्राअभावी विम्याचा दावा नाकारु शकत नाही
मात्र नवीन विमा खरेदी करताना पीयूषी प्रमाणपत्र आवश्यक आहे
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने याविषयीचे निर्देश दिलेले आहेत
संपूर्ण अंधेरी मतदार संघातील युवासेना शिंदे गटात सामील होणार
अनिल परब यांच्या अंधेरी मतदारसंघांमध्ये जबाबदारी होती, त्याच ठिकाणी युवा सेनेला खिंडार
युवा सेना विधानसभा समन्वयक योगराज अरुण गोसावी, टायगर ग्रुपचे रोमिओ राठोडसह संपूर्ण टायगर ग्रुपचे शिंदे गटात सामिल होणार
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 15 ओव्हर्सनंतर पाकच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहे. पण सामन्यावर इंग्लंडची पकड आहे. सध्या पाकची स्थिती 106/4 आहे. शान मसूद 34 आणि शादाब खान 10 धावांवर खेळतोय.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: बेन स्टोक्सने पाकिस्तानची चौथी विकेट काढली आहे. त्याने एका अप्रतिम चेंडूवर इफ्तिखार अहमदला शुन्यावर विकेटकीपर जोस बटलरकरवी झेलबाद केलं. 13 ओव्हर्सनंतर पाकिस्तानची 90/4 अशी स्थिती आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: आदिल रशिदने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. आपल्याच गोलंदाजीवर त्याने कॅप्टन बाबर आजमला कॅचआऊट केलं. बाबरने 28 चेंडूत 32 धावा केल्या. यात 2 चौकार होते. राशिदची ही दुसरी विकेट आहे. 12 ओव्हर्सनंतर पाकिस्तानची 84/3 अशी स्थिती आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 11 वी ओव्हर टाकणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनला शान मसूदने धुतलं. या ओव्हरमध्ये 16 धावा निघाल्या.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. पाकिस्तानची 68/2 अशी स्थिती आहे. बाबर आजम (29) आणि शान मसूद (11) धावांवर खेळतोय.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 8 वी ओव्हर टाकणाऱ्या आदिल रशिदने आपल्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानची दुसरी विकेट घेतली. मोहम्मद हॅरिसला त्याने 8 रन्सवर बेन स्टोक्सकरवी झेलबाद केलं. पाकिस्तानची स्थिती 45/2 आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: 7 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. पाकिस्तानच्या एक बाद 45 धावा झाल्या आहेत.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: पावरप्लेमध्ये इंग्लंडने चांगली गोलंदाजी केली. सहा ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या एक बाद 39 धावा झाल्या आहेत. कॅप्टन बाबर आजम (16) आणि मोहम्मद हॅरिसची (4 )जोडी मैदानात आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: सॅम करनने पाकिस्तानला पहिला झटका दिला आहे. मोहम्मद रिझवानला त्याने बोल्ड केलं. रिझवानने 14 चेंडूत 15 धावा केल्या. यात एक सिक्स आहे.
पाकिस्तान vs इंग्लंड लाइव्ह स्कोर: पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने पहिला सिक्स मारला. पाकिस्तानच्या चार ओव्हर्सनंतर बिनबाद 28 धावा झाल्या आहेत.
ख्रिस वोक्सने दुसरी ओव्हर टाकली. पाकिस्तानच्या बिनबाद 12 धावा झाल्या आहेत.
पहिल्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या बिनबाद 8 धावा झाल्या आहेत. मोहम्मद रिझवान आणि बाबर आजमची जोडी मैदानात आहे. बेन स्टोक्सन पहिली ओव्हर टाकली.
इंग्लंड- जोस बटलर (कॅप्टन), एलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक, लियम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, क्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद
पाकिस्तान- बाबर आजम (कॅप्टन), मोहम्मद रिजवान, मोहम्मद हॅरिस, शान मसूद, इफ्तखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ,
टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने टॉस जिकंला आहे. सेमीफायनलप्रमाणे त्याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. म्हणजे पाकिस्तानची टीम प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.