मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला आठवड्याभराचा अवधी उरला आहे. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप नंतर पहिल्यांदा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. या सामन्यााधी पाकिस्तानला एक झटका बसला आहे. पाकिस्तानचा स्टार डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिकी (shaheen shah afridi) या स्पर्धेत खेळणार नाहीय. दुखापतीमुळे तो आशिया कपला मुकणार आहे. आफ्रिदीची गणना जगातील धोकादायक गोलंदाजांमध्ये होते. आफ्रिदीच्या संघाबाहेर जाण्यावरुन पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज अकिब जावेदने पाकिस्तनी बोर्डाला (PCB) खडे बोल सुनावले आहेत. आशिया कप मध्ये पाकिस्तान भारताचा सामना करु शकणार नाही, असही त्याने म्हटलं आहे.
वर्कलोड हे आफ्रिदीच्या दुखापतीमागे एक कारण असल्याचं आकिब जावेदने सांगितलं. “आफ्रिदी सतत क्रिकेट खेळतोय. टीम मॅनेजमेंटने संयम बाळगला पाहिजे. त्यांनी घाबरुन न जाता, गोलंदाजाला बरा होण्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे” असं जावेद जिओ न्यूजशी बोलताना म्हणाला. “पाकिस्तानसाठी हा एक मोठा झटका आहे. यात कुठलीही शंका नाही. शाहीद फलंदाजांसमोर असतो, त्यावेळी सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये फलंदाज पाय वाचवू की, विकेट हाच विचार करतो. आफ्रिदी बाहेर गेल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. भारताची मधली फळी भक्कम आहे. त्यांच्याकडे चांगले ऑलराऊंडसर्स आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी विजय मिळवणं अवघड बनलं आहे” असं अकिब जावेद अन्य एका मुलाखतीत म्हणाला.
पाकिस्तानने 2 वेळा आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला हरवलं आहे. एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये आणि दुसऱ्यांदा मागच्यावर्षी वर्ल्ड कप मध्ये. दोन्हीवेळा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने भारताला दबावाखाली आणलं आणि पाकिस्तानचा संघ जिंकला. आफ्रिदी बाहेर गेल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला दिलासा मिळाला आहे, असं जावेद म्हणाले. आफ्रिदीने पुनरागमन करताना हसन अली सारखी चूक करु नये, असा सल्लाही जावेद यांनी दिला. “गुडघ्याची दुखापत गंभीर असते. जेव्हा तुम्ही उडी मारुन लँड होता, त्यावेळी जॉइंट्स वर दबाव येतो. दुखापत पूर्णपणे बरी झाली नसेल, तर वेगावर परिणाम होतो. तुमचा बॅलन्सही बिघडतो. बोर्डाने आफ्रिदीचे उपचार चांगल्या ठिकाणी करावेत” असा सल्लाही त्यांनी दिला.