IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात 2008 साली झाली होती. या लीगच्या पहिल्या सीजनमध्ये अनेक पाकिस्तानी खेळाड़ू सहभागी झाले होते. शाहीद आफ्रिदी, सोहेल तन्वीर, कामरान अकमल सारखे खेळाडू आयपीएलच्या 2008 पहिल्या सीजनमध्ये खेळले. पण त्यानंतर दोन्ही देशातील राजकीय संबंध बिघडले. त्यामुळे त्यानंतर आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू दिसले नाहीत. आता आयपीएल फ्रेंचायजींच्या टीममध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळताना दिसतील.
भारतात नाही, तर पाकिस्तानी खेळाडू अमेरिकेमध्ये खेळणार आहेत. अमेरिकेत टी 20 लीग सुरु होतेय. मेजर क्रिकेट लीग त्याच नाव आहे. या मेजर लीगमध्ये आयपीएलच्या चार फ्रेंचायजींनी टीम विकत घेतली आहे. फ्रेंचायजींनी पहिल्या ड्राफ्टमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना निवडलय.
या टीम्समध्ये पाकिस्तानी खेळाडू
मेजर लीगमध्ये मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली फ्रेंचायजीने टीम विकत घेतली आहे. मुंबई फ्रेंचायजीच्या टीमच नाव आहे MI न्यू यॉर्क, कोलकाता फ्रेंचायजी टीमच नाव आहे, लॉस एंजल्स नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रेंचायजीच नाव आहे, टेक्सास आणि दिल्ली कॅपिटल्सच्या टीमच नाव आहे सीटल ओर्कस. MI न्यू यॉर्कने हम्माद आजम आणि एहसान आदिल या दोघांना विकत घेतलं आहे. सीटलने नौमान अनवरला विकत घेतलय. समी अस्लमला टेक्सासने विकत घेतलय. लॉस एंजल्स नाइट रायडर्सने रौफ बदरला आपल्यासोबत जोडलय.
हम्माद आजम अमेरिकेत का आला?
पाकिस्तानचे हे ते प्लेयर्स आहेत, ज्यांना देशात सध्या कोणी विचारत नाही. क्रिकेट खेळण्यासाठी ते अमेरिकेत आलेत. हम्माद आजमला पाकिस्तानात पुरेशी संधी मिळाली नाही, म्हणून तो अमेरिकेत आलाय.
द्विपक्षीय सीरीज नाहीच
आयपीएलचा पहिला सीजन सोडल्यास पाकिस्तानी खेळाडू त्यानंतर आयपीएलमध्ये खेळलेले नाहीत. नजीक भविष्यात याची शक्यता कमी आहे. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध खूपच बिघडले आहेत. 2013 नंतर दोन्ही देशांमध्ये कुठलीही द्विपक्षीय सीरीज झालेली नाही. आशिया कप आणि आयसीसी टुर्नामेंट्समध्ये दोन्ही टीम्स आमने-सामने येतात.