IND vs AUS 3rd Test Match : बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील तिसरा कसोटी सामना 1 मार्चपासून सुरु होणार आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा तिसरा कसोटी सामना होईल. दिल्ली टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाला एक आठवड्याचा ब्रेक मिळाला होता. तिसरी कसोटी जिंकून सीरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलिया सीरीजमधील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या कसोटीपूर्वी 4 मॅच विनर खेळाडू बाहेर गेले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स सीरीजच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. तो मायदेशी ऑस्ट्रेलियात परतलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमिन्सच्या आईची तब्येत चांगली नाहीय. आता स्टीव्ह स्मिथ नेतृत्व करणार आहे. स्मिथची 2021 मध्ये उपकर्णधारपदी निवड झाली. त्यानंतर त्याने दोन टेस्ट मॅचमध्ये टीमच नेतृत्व केलं. एडिलेडमध्ये कसोटी सामना झाला होता.
डेविड वॉर्नरच्या जागी कोणाला संधी?
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक ओपनर डेविड वॉर्नर दुखापतीमुळे उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीय. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात मोहम्मद सिराजचा एक चेंडू डेविड वॉर्नरच्या हेल्मेटला लागला. डेविड वॉर्नर दुखापतीमुळे पूर्ण टेस्ट सीरीजमध्ये खेळू शकणार नाहीय. दिल्ली टेस्टमध्ये त्याच्याजागी मॅट रेनशॉ चा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. पुढच्या दोन कसोटीत त्याला संधी मिळू शकते.
या गोलंदाजी कमतरता जाणवेल
ऑस्ट्रेलियन टीमचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड सुद्धा सीरीजला मुकणार आहे. जोश हेजलवूड अकिलिसच्या दुखापतीमधून अजूनपर्यंत पूर्णपणे सावरु शकलेला नाही. मागच्या महिन्यात गोलंदाजी करताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. भारत दौऱ्यात पहिल्या दोन कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही.
एका खेळाडूला केलं रिलीज
ऑस्ट्रेलियन स्पिन गोलंदाज एश्टन एगरला सुद्धा सीरीजच्या मध्यावर रिलीज केलय. त्याला सुद्धा सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेलियात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी एश्टन एगरला रिलीज करण्यात आलय. एश्टन एगर देशांतर्गत सीजनच्या शेवटच्या टप्प्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून खेळणार आहे.