मुंबई: IPL 2022 स्पर्धेला एक महिना झाला आहे. आतापर्यंत 40 सामने झाले आहेत. सर्वच संघांनी 14 पैकी आपले आठ-आठ सामने खेळले आहेत. हळूहळू स्पर्धा लीग स्टेजच्या अंतिम टप्प्याकडे जात आहे. शुक्रवारी 29 एप्रिलला पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (PBKS vs LSG) सीजनमधला 42 वा सामना खेळला जाईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच परस्पराविरुद्ध खेळणार आहेत. दोन्ही टीम्समध्ये मोठ्या क्षमतेचे खेळाडू आहेत. पण कामगिरीत सातत्य नाहीय. खासकरुन पंजाब संघाच्या कामगिरीत सातत्य दिसलेलं नाही. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर (Pune Mca Stadium) हा सामना होत आहे. मागच्या सामन्याात चेन्नईला पराभूत करणाऱ्या खेळाडूंना पंजाब किंग्सचा संघ संधी देऊ शकतो.
भानुका राजपक्षाच्या समावेशाने पंजाबची फलंदाजी मजबूत झाली आहे. मागच्या सामन्यात ऑलराऊंडर ऋषी धवननेही चमक दाखवली होती. त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण गोलंदाजीमध्ये संघाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सहज पराभव केला होता. केएल राहुल शिवाय दुसरा कुठलाही फलंदाज जास्त योगदान देऊ शकला नाही. लखनौच्या संघात एक बदल होण्याची शक्यता आहे. आवेश खान फिट असेल, तर मोहसिन खानच्या जागी त्याचा संघात समावेश केला जाईल. मोहसिनने मुंबई विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. आवेश खानसाठी त्याला आपली जागा सोडावी लागेल.
पंजाब: मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षा, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयरस्टो, जितेश शर्मा, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह आणि संदीप शर्मा
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, मनीष पांडे, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, रवी बिश्नोई, दुश्मंथा चमीरा आणि आवेश खान