IPL 2021: आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज सुपर संडे आहे. आजच्या दिवसात दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळवला जात आहे. स्पर्धेतील या 48 व्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत पडीक्कलच्या दमदार सुरुवातीनंतर मॅक्सवेलच्या अर्धशतकाने 7 बाद 165 धावांपर्यंत मजल मारली आहे. पण आरसीबीच्या फलंदाजीदरम्यान पंचाच्या एका निर्णय़ामुळे पंजाबचा कर्णधार केएल राहुल मैदानावरच भडकला होता.
शारजाहच्या क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु असलेल्या सामन्यात बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यात कर्णधारल विराटसह सलामीवीर देवदत्तने उत्तम अशी सुरुवात करुन दिली. दरम्यान 10 षटकात विराट आणि डॅनियल हे दोघेही एका मागोमाग एक बाद झाले. ज्यानंतर आरसीबीची गाडी थोडी धिमी झाली. पण देवदत्तने मात्र तुफान 40 धावा लगावल्याचं. दरम्यान देवदत्त हा आठव्या षटकातच बाद झाला असता पण पंचाच्या निर्णय़ामुळे त्याला जीवदान मिळालं.
पंजाब संघाकडून आठवी ओवर टाकण्यासाठी रवी बिश्नोई आला. तिसऱ्याच चेंडूवर पडिक्कलने रिवर्स स्वीप खेळला, पण चेंडू बॅटला नीट कनेक्ट न झाल्याने कर्णधार राहुलच्या थेट हातात गेला. त्यावेळी राहुलने अपील केली. पण पंचानी नॉटआऊट दिलं. त्यानंतर राहुलने लगेचच DRS घेतला. पण त्यानंतरच मोठा गोंधळ झाला. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत असणारे कृष्णामचारी श्रीनिवासन यांनी रिप्लेमध्ये हा शॉट पाहिला. यावेळी चेंडू अल्ट्रा एजमध्ये बॅट आणि ग्लोव्जजवळ लागल्याचे दिसत होते. पण त्यांनी तरीही नाबाद निर्णय़ दिला. ज्यानंतर भडकेलेल्या राहुलने थेट मैदानावरील पंचानाही याबाबत विचारणा केली. पण निर्णय़ तोच राहिला. दरम्यान यामुळे पंजाबने त्यांचा एकमेव रिव्ह्यूही गमावला.
Clear spike, still not out ? pic.twitter.com/KnPWZRTUkw
— Umakant ™ (@Umakant_27) October 3, 2021
या तिसऱ्या पंचाच्या निर्णय़ानंतर सोशल मीडियावरही अनेक पोस्ट पडत आहेत. यावेळी रिप्लेचा फोटो टाकून नेटकरी स्पष्ट बाद असल्याबाबत पोस्ट करत आहेत. तर न्यूझीलंडचा माजी ऑलराउंडर स्कॉट स्टायरिस याने थेट पंचाच्या या चूकीच्या निर्णयासाठी त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
Sack the 3rd umpire immediately #SelectDugout
What a joke!
— Scott Styris (@scottbstyris) October 3, 2021
हे ही वाचा
RCB vs PBKS Live Score, IPL 2021 : नाणेफेक जिंकून बँगलोरचा फलंदाजी करण्याचा निर्णय
IPL 2021: अपना टाइम जल्दी आएगा… गोलंदाजीबाबत हार्दिक पंड्याचा मोठा खुलासा
(PBKS vs RCB Devdutt padikkal out 3rd umpire decision controvery made kl rahul angry)