IPL 2021 : आयपीएलच्या स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना सुरु आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत पंजाबने गोलंदाजी निवडली. राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी आणि लुईसने उत्तम सुरुवात केली. त्यानंतर महिपालने देखील धाकड फलंदाजी करत 43 धावा केल्या. पण पंजाबकडून युवा अर्शदीपने अप्रतिम गोलंदाजी करत 5 विकेट घेतल्या. त्यामुळे राजस्थानचा संघ 185 धावांवर सर्वबाद झाला आणि पंजाबला विजयासाठी 186 धावांची गरज होती. अशावेळी पंजाबचे सलामीवीर मयांक आणि राहुल यांनी उत्तम सुरवात करत शतकी भागिदारी केली. त्यानंतर पुरन आणि मार्करम यांनी उर्वरीत जबाबदारी पार पाडली देखील. पण अखेरच्या षटकात राजस्थानचा युवा गोलंदाज कार्तिक त्यागीने अप्रतिम अशा दोन विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.
अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी केवळ 4 धावांची गरज होती. पण यावेळी केवळ 1 रन देत राजस्थानच्या कार्तिक त्यागीने अप्रतिम गोलंदाजी करत दोन विकेटही घेतल्या. त्यामुळे राजस्थानचा संघ 2 धावांनी विजयी झाला.
अखेरच्या 3 चेंडूत पंजाबला विजयासाठी 3 धावांची गरज आहे.
Three in Three.
Who’s taking this home?
Live – https://t.co/odSnFtwBAF #PBKSvRR #VIVOIPL pic.twitter.com/lxPNWFKI1K
— IndianPremierLeague (@IPL) September 21, 2021
17 व्या षटकात निकोलस पूरनने मुस्तफिजरू रहमानवर हल्लाबोल करत एक षटकार आणि चौकाराच्या मदतीने 14 धावा लुटल्या. पंजाबला विजयासाठी तीन षटकात 18 धावांची आवश्यकता (पंजाब 168/2)
दोन्ही सलामीवीर लागोपाठ बाद झाल्यानंतर एडन मार्क्रम (14) आणि निकोलस पूरनने (15) 28 धावांची भागीदारी करत मोर्चा सांभाळला आहे. पंजाबला आता 4 षटकात 32 धावांची आवश्यकता. (पंजाब 154/2)
पंजाबचा कर्णधार केएल राहुल बाद होताच सेट फलंदाज मयांक अगरवालही बाद झाला आहे. राहुल तेवतियाच्या चेंडूवर लियमने त्याचा झेल घेतला आहे.
सुरुवातीपासून तीन जीवदान मिळालेला केएल राहुल अखेर बाद झाला आहे. चेतन साकरियाच्या गोलंदाजीवर कार्तिक त्यागीने त्याचा झेल घेतला आहे. राहुलचं अर्धशतक एका धावेने हुकलं.
पंजाबचा सलामीवीर मयांक अगरवालने धमाकेदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. त्याने केवळ 34 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. 6 चौकार आणि 2 षटकार त्याने ठोकले आहेत.
पंजाबता सलामीवीर मयांक अगरवालने 8 व्या षटकात कार्तिक त्यागीला लागोपाठ तीन चौकार लगावले आहेत.
पंजाबचा कर्णधार केएल राहुलने 3000 आयपीएल धावा पूर्ण केल्या आहेत.
Milestone Unlocked ?
3⃣0⃣0⃣0⃣ IPL runs & going strong! ??
Well done, @klrahul11 ? ? #VIVOIPL #PBKSvRR
Follow the match ? https://t.co/odSnFtwBAF pic.twitter.com/7mCiJP2OLU
— IndianPremierLeague (@IPL) September 21, 2021
कर्नाटककडून खेळणारे केएल राहुल आणि मयांक अगरवाल हे दोघेही पंजाबकडून सलामीसाठी आले आहेत. राहुलने येताच उत्तम फलंदाजी करत खेळाला चांगली सुरुवात केली आहे.
उत्तम सुरुवात केल्यानंतर राजस्थानला अखेरच्या षटकात कमाल करता आली नाही. त्यामुळे ते 200 चा आकडा पार करु शकले नाहीत. पण तरी एक उत्तम आव्हान त्यांनी पंजाबसमोर ठेवले आहे. पंजाबला विजयासाठी 186 धावांची गरज आहे.
अखेरच्या चेंडूवर अर्शदीपने कार्तिक त्यागीला त्रिफळाचीत करत राजस्थानला सर्वबाद केलं आहे. राजस्थानचा संघ 185 धावा करण्यात यशस्वी झाला आहे.
अर्शदीपने अखेरच्या षटकात चेतन साकरियाला बाद केलं आहे. या विकेट्सह त्याने सामन्यात चार विकेट्स नावावर केल्या आहेत.
मोहम्मद शमीने आणखी एक विकेट घेतला आहे. त्याने ख्रिस मॉरीसला बाद केलं आहे. एकाच षटकात शमीला दोन विकेट्स मिळाले आहेत.
अनुभवी मोहम्मद शमीने आणखी एक विकेट घेत राजस्थानच्या राहुल तेवतियाला त्रिफळाचीत केलं आहे. राहलु 2 धावा करुन बाद झाला आहे.
खेळायला आल्यापासून षटकार आणि चौकारांची बरसात करणाऱ्या राजस्थानच्या महिपालची विकेट अर्शदीपने घेतली आहे. सीमारेषेवर मार्करमनेच त्याचा झेल घेतला आहे.
अनुबवी मोहम्मद शमीने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागची विकेट घेतली आहे. सीमारेषेवर असणाऱ्या मार्करमने परागचा झेल पकडला आहे.
राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू महिपाल लोमरोरने दीपक हुडाच्या ओव्हरला धमाकेदार फलंदाजी करत तब्बल 24 धावा ठोकल्या आहेत. त्याने दोन चौकार, दोन षटकार ठोकत, चार धावा धावून घेतल्या आहेत.
सुरुवातीपासून उत्तम खेळी करणारा राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवाल 49 धावांवर बाद झाला आहे. हरप्रीत ब्रारच्या चेंडूवर मयांकने त्याचा झेल पकडला आहे.
अर्शदीपने लियम लिव्हिंगस्टोन याची विकेट घेत संघाला मोठं यश मिळवून दिलं आहे. फॅब अॅलनने उत्तम झेल घेत लियमला तंबूत परतवलं आहे.
सामन्यात 10 ओव्हर संपल्यानंतर राजस्थान रॉयल्सने 94 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची विकेट इशान पोरेलने घेतली आहे. इशानच्या चेंडूवर केएल राहुलने संजूचा झेल पकडला.
पंजाबचा युवा खेळाडू अर्शदीप सिंगने पहिली विकेट घेत संघाला पहिलं यश मिळवून दिलं आहे. त्याच्या चेंडूवर मयांक अगरवालने लुईसचा झेल घेतला आहे.
राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि एविन लुईस यांनी चौकारांची बरसात करत 5 षटकांत 53 धावा केल्या आहेत.
राजस्थानचा सलामीवीर एविन लुईस तुफानी खेळी करत असून इशान चौथ्या षटकात त्याने इशानला चार चौकार लगावले आहेत.
सामन्याला सुरुवात होताच पहिल्याच षटकात युवा खेळाडू यशस्वी जैसवालने अनुभवी मोहम्मद शमीला दोन चौकार लगावले आहेत.
संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), एविन लुईस, यशस्वी जैसवाल, लियम लिविंगस्टोन, रियान पराग, राहुल तेवतिया, माहिपाल लोमरोर, ख्रिस मॉरीस, के. त्यागी, मुस्तफिजूर रेहमान, चेतन सकारीया.
Match 32. Rajasthan Royals XI: E Lewis, Y Jaiswal, S Samson, M Lomror, L Livingstone, R Parag, R Tewatia, C Morris, K Tyagi, C Sakariya, M Rahman https://t.co/hcPS4WcfeQ #PBKSvRR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) September 21, 2021
पंजाब किंग्ज- केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, निकोलस पुरन, दीपक हुडा, एफ आलेन, इशान पोरेल, हरप्रीत ब्रार, आदिल रशिद, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग.
Match 32. Punjab Kings XI: KL Rahul, M Agarwal, N Pooran, A Markram, D Hooda, F Allen, I Porel, H Brar, M Shami, A Rashid, A Singh https://t.co/hcPS4WcfeQ #PBKSvRR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) September 21, 2021
सामन्याला काही वेळातच सुरुवात होणार आहे. दरम्यान नुकतीच नाणेफेक झाली असून पंजाबने गोलंदाजी निवडली आहे.
Match 32. Punjab Kings win the toss and elect to field https://t.co/hcPS4WcfeQ #PBKSvRR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) September 21, 2021
आयपीएल 2021 च्या पहिल्या पर्वात पंजाब किंग्सने 8 पैकी 3 सामने जिंकत सातवं स्थान पटकावलं आहे. तर राजस्थान रॉयल्सने 7 पैकी 3 सामने जिंकत सहावं स्थान पटकावलं आहे.
आज राजस्थान आणि पंजाब अशा दोन्ही संघाकडून मिळून 4 खेळाडू आय़पीएलमध्ये पदार्पण करणार आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्ससाठी एविन लुइस तर पंजाबकडून इशान पोरेल, एडेन मारक्रम आणि आदिल रशीद डेब्यू करतील.