आयपीएल 2021 च्या 37 व्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादवर 5 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 125 धावा जमवल्या होत्या. पंजाबने दिलेलं 126 धावांचं आव्हन हैदराबादच्या फलंदाजांना पेलवेलं नाही. हैदराबादला निर्धारित 20 षटकात 7 गड्यांच्या बदल्यात 120 धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी हा सामना पंजाबने 5 धावांनी जिंकला. तसेच पंजाबने या स्पर्धेतील त्यांचं आव्हानदेखील जिवंत ठेवलं आहे.
126 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादची सुरुवात अत्यंत वाईट झाली. पहिल्याच षटकात अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर 2 धावांवर बाद झाल्या त्यापाठोपाठ कर्णधार केन विलियमसनदेखील एक धाव करुन बाद झाला. या सामन्यात हैदराबादकडून जेसन होल्डर आणि सलामीवीर रिद्धीमान साहा व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. हैदराबादच्या फलंदाजांची हाराकिरी या सामन्यातील त्यांच्या पराभवामागचं प्रमुख कारण ठरली.
अखेरच्या षटकात विजयासाठी हैदराबादला 17 धावांची आवश्यकता होती. मात्र हैदराबदचे फलंदाज केवळ 11 धावा जमवण्यात यशस्वी ठरले, त्यामुळे अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने हैदराबादवर 5 धावांनी विजय मिळवला आहे.
अर्शदीप सिंगने हैदराबादला सातवा धक्का दिला आहे. त्याने राशिद खानला 3 धावांवर असताना स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. (हैदराबाद 105/7)
हैदराबादने सहावी विकेट गमावली आहे. सुरुवातीपासून मैदानात तळ ठोकून बसलेल्या रिद्धीमान साहाला अर्शदीप सिंगने धावचित केलं. (हैदराबाद 94/6)
हैदराबादने पाचवी विकेट गमावली आहे. रवी बिष्णोईने अब्दूल समदला (1) ख्रिस गेलकरवी झेलबाद केलं. (हैदराबाद 60/5)
हैदराबादने चौथी विकेट गमावली आहे. रवी बिष्णोईने केदार जाधवला 12 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (हैदराबाद 56/4)
पंजाबला पहिल्याच षटकात मोठं यश मिळालं आहे. मोहम्मद शमीने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 2 धावांवर असताना यष्टीरक्षक के. एल. राहुलकरवी झेलबाद केलं.
मोहम्मद शमीने हैदराबादला मोठा धक्का दिला आहे. शमीने हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनला त्रिफळाचित केलं (हैदराबाद 10/2)
निर्धारित 20 षटकात पंजाबला केवळ 125 धावांपर्यंत मजल मारला आली आहे. या बदल्यात त्यांनी 7 फलंदाज गमावले.
पंजाब किंग्सने 17 षटकात 6 गड्यांच्या बदल्यात 100 धावा धावफलकावर झळकावल्या आहेत.
पंजाबचा सहावा फलंदाज बाद झाला आहे. जेसन होल्डरने दीपक हुडाला जगदीशून सूचितकरवी झेलबाद केलं. (पंजाब 96/6)
पंजाब किंग्सने दुसरी विकेट गमावली आहे. जेसन होल्डरने मयंक अग्रवालला 5 धावांवर असताना केन विलियमसनकरवी झेलबाद केलं. (पंजाब 27/2)
पंजाब किंग्सला पहिला धक्का बसला आहे. जेसन होल्डरने के. एल. राहुलला (21) जगदीशन सूचितकरवी (सबस्टिट्यूट) झेलबाद केलं. (पंजाब 26/1)
पंजाबने सलामीवीर लोकेश राहूल आणि मयंक अग्रवाल मैदानात दाखल झाले आहेत. तर हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनने चेंडू संदीप शर्माकडे सोपवला आहे.
नाणेफेक जिंकून सनरायझऱ्स हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Toss Update from Sharjah! @SunRisers have elected to bowl against @PunjabKingsIPL. #VIVOIPL #SRHvPBKS
Follow the match ? https://t.co/B6ITrxUyyF pic.twitter.com/Wt5B3W5yoF
— IndianPremierLeague (@IPL) September 25, 2021