IPL 2022: क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये मैदान गाजवणार, Jos buttler ची भारतीय गोलंदाजाबद्दल भविष्यवाणी

| Updated on: Apr 04, 2022 | 7:48 PM

IPL 2022: आयपीएलच्या (IPL) 15 व्या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सचं (Rajasthan Royals) धडाकेबाज प्रदर्शन सुरु आहे.

IPL 2022: क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये मैदान गाजवणार, Jos buttler ची भारतीय गोलंदाजाबद्दल भविष्यवाणी
IPL 2022: जोस बटलर राजस्थान रॉयल्स
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई: आयपीएलच्या (IPL) 15 व्या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सचं (Rajasthan Royals) धडाकेबाज प्रदर्शन सुरु आहे. टीमने आपले दोन्ही सामने जिंकले असून यामध्ये गोलंदाजांच महत्त्वपूर्ण योगदान आहे. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने (Jos buttler) या दरम्यान एका वेगवान गोलंदाजाचं विशेष कौतुक केलं आहे. बटलरला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने प्रभावित केलं आहे. प्रसिद्ध कृष्णामध्ये (Prasidh krishna) प्रचंड टॅलेंट असून तो तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करु शकतो. मागच्यावर्षी मार्च महिन्यात वनडे क्रिकेटमध्ये डेब्यु करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने वर्षभरात आपल्या कामगिरीने प्रभावित केलं आहे. वेग आणि बाऊन्सने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना सतावल होतं. कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतानाही प्रसिद्ध कृष्णाने चांगली कामगिरी केली आहे.

इकॉनमी रेट 6.62

“प्रसिद्ध कृष्णाकडे वेग आणि कौशल्य आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये यशस्वी गोलंदाज बनण्याचे सर्व गुण त्याच्यामध्ये आहेत. मला कृष्णाला कसोटी क्रिकेटमध्ये खेळतानाही बघायचे आहे” रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध मंगळवारी होणाऱ्या सामन्याआधी बटलरने हे सांगितलं. प्रसिद्ध कृष्णाने राजस्थानसाठी दोन सामन्यात तीन विकेट घेतलेत. कृष्णाचा इकॉनमी रेट 6.62 आहे. कृष्णाची क्षमता लक्षात घेऊनच राजस्थान रॉयल्सने त्याला 10 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. मागच्या सीजनमध्ये कृष्णाची किंमत फक्त 20 लाख रुपये होती.

अनुभवाचा फायदा मिळतोय

“महत्त्वाच्या प्रसंगी रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट सारख्या अनुभवी खेळाडूंच्या बहुमूल्य अनुभवाचा फायदा मिळतोय. त्यांचा अनुभव बहुमूल्य असून त्यांचं संघात असणं आवश्यक आहे. मुंबई विरुद्ध संतुलित सामना झाला. आम्हाला विकेटची आवश्यकता होती. अश्विनने शानदार विकेट काढली. त्यानंतर चहलने दोन चेंडूत विकेट काढल्या” असं बटलरने सांगितलं.