VIDEO : थरारक सामना, 1 चेंडू राखून विजय, धोनीच्या जुन्या मित्राने पाकिस्तानात पलटली बाजी

| Updated on: Mar 07, 2023 | 1:01 PM

PSL 2023 : धोनीच्या खांद्याला खांदा लावून त्याने CSK च्या विजयाची स्क्रिप्ट लिहीली आहे. तो धोनीच्या घातक अस्त्रांपैकी एक होता. याआधी आमेरने 2 ओव्हरमध्ये 10 धावा देऊन एक विकेट काढला होता. स्ट्राइकवर क्वेटा ग्लॅडिएटर्सचा सर्फराज होता.

VIDEO : थरारक सामना, 1 चेंडू राखून विजय, धोनीच्या जुन्या मित्राने पाकिस्तानात पलटली बाजी
PSL 2023
Image Credit source: VideoGrab
Follow us on

PSL 2023 : हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, हा फिल्मी डायलॉग तुम्ही ऐकला असेल. पाकिस्तानात हेच पहायला मिळालं. तिथे T20 लीग PSL मध्ये धोनीच्या जुन्या मित्राने विजयाचा अध्याय लिहिला. लास्ट ओव्हरपर्यंत खेचल्या गेलेल्या सामन्यात त्याने आपल्या टीमला विजय मिळवून दिला. क्रीजवर उतरला तेच विजयासाठी. PSL लीगमध्ये क्वेटा ग्लॅडिएटर्सने कराची किंग्सवर 1 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयाचा नायक ठरला ड्वेन प्रिटोरियस.
ड्वेन प्रिटोरियस आता आयपीएलमध्ये खेळत नाही. पण भारतात आयपीएलमध्ये त्याने धोनीच्या खांद्याला खांदा लावून CSK च्या विजयाची स्क्रिप्ट लिहीली आहे. तो धोनीच्या घातक अस्त्रांपैकी एक होता. कधी काळी धोनीचा विश्वासू सहकारी असलेल्या ड्वेनने पाकिस्तानात एक मॅच फिरवली.

लास्ट ओव्हरमध्ये हव्या होत्या 8 धावा

क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि कराची किंग्समधील सामना लास्ट ओव्हरपर्यंत खेचला गेला. शेवटच्या 6 चेंडूवर क्वेटा ग्लॅडिएटर्सला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता होती. स्कोर जास्त नव्हता. पण सामना रोमांचक झाला. कराची किंग्सने आमेर यमीनच्या हाती चेंडू सोपवला. याआधी आमेरने 2 ओव्हरमध्ये 10 धावा देऊन एक विकेट काढला होता. स्ट्राइकवर क्वेटा ग्लॅडिएटर्सचा सर्फराज होता.


क्रीजवर उतरला धोनीचा मित्र

पहिल्या चेंडूवर सिंगल घेऊन सर्फराजने मार्टिन गुप्टिलला स्ट्राइक दिली. दुसऱ्या चेंडूवर धाव घेताना ताळमेळ नसल्याने सर्फराज रनआऊट झाला. त्यावेळी धोनीचा जुना मित्र ड्वेन प्रिटोरियस क्रीजवर आला. टीमला अजूनही विजयासाठी 7 धावांची गरज होती.

3 चेंडूत 333 चा स्ट्राइक रेट

प्रिटोरियसने क्रीजवर आल्यानंतर आमेर यमीनच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या. त्यानंतर 5 व्या चेंडूवर चौकार मारुन टीमला एक चेंडू राखून विजय मिळवून दिला. अशा प्रकारे ड्वेन प्रिटोरियस 3 चेंडूंचा सामना करुन क्वेटा ग्लॅडिएटर्सला विजय मिळवून दिला. कराची किंग्सने पहिली बॅटिंग केली. 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 164 धावा केल्या. क्वेटा ग्लॅडिएटर्सने 19.5 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं.