पर्थ: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडियाचा पराभव झाला. यंदाच्या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पाच विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाने आज दक्षिण आफ्रिकेला सहजासहजी जिंकू दिलं नाही. टीम इंडिया आज लढून हरली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी सोपं लक्ष्य दिलं होतं.
….तर कदाचित टीम इंडिया जिंकली असती
पण पर्थच्या वेगवान विकेटवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केलं. दक्षिण आफ्रिकेच्या टीमला विजयासाठी शेवटच्या ओव्हरपर्यंत झुंजवलं. टीम इंडियाकडून आज फिल्डिंगमध्ये काही चूका झाल्या. या चूका झाल्या नसत्या, तर कदाचित टीम इंडिया जिंकली सुद्धा असती.
विराट कोहली उत्तम फिल्डिंर सुद्धा आहे
विराट कोहली हा क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू आहे. बॅटिंग बरोबर तो फिल्डिंगही उत्तम करतो. आज तो बॅटने विशेष कमाल दाखवू शकला नाही. दोन चौकार मारुन त्याने चांगली सुरुवात केली होती. पण 12 धावांवर तो बाद झाला. विराट कोहली उत्तम फिल्डिंर सुद्धा आहे.
Virat Kohli dropped easy catch of Markaram set batsman and what we r hopping from India #INDvsSA pic.twitter.com/kr2dTkJNX5
— Tauseef Ahmad Awan (@tauseef_awan) October 30, 2022
विकेट त्यावेळी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा होता
धावा वाचवण्याबरोबरच कॅच त्याच्या हातातून सहसा सुटत नाहीत. पण आज पर्थच्या मैदानात असं घडलं. विराट कोहलीच्या हातातून एक सोपा झेल सुटला. 12 व्या ओव्हरमध्ये अश्विन गोलंदाजी करत असताना विराटच्या हातून ही कॅच सुटली. खरंतर एडन मार्करामचा विकेट त्यावेळी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा होता.
Poor Ashwin, thinking what kohli did…. pic.twitter.com/vtEgDwZGkV
— Tahrim I Butt (@TahrimButt1) October 30, 2022
विराटकडून अशी चूक कशी झाली?
टीम इंडियाने 24 धावात दक्षिण आफ्रिकेचे तीन विकेट काढून त्यांना बॅकफूटवर ढकललं होतं. मार्कराम आणि मिलरने डाव सावरुन त्यांची सुटका केली. दोघांनी हाफ सेंच्युरी झळकवली. मार्करामने 52 रन्स आणि मिलरने नाबाद 59 धावा केल्या. मार्करामच्या विकेटची गरज असताना विराटच्या हातातून झेल सुटला.
विराटकडून कॅच कशी सुटू शकते? असा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. कारण विराट कोहली सर्वोत्तम फिल्डर आहे. विराटच्या हातातून मार्करामचा लॉलीपॉप कॅच सुटल्याच पाहून अश्विनलाही विश्वास बसला नाही. टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं 134 धावांच लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 2 चेंडू बाकी असताना पूर्ण केलं.