दुबई : येथील भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा थरार संपताच, आयपीएलशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. ही बातमी मोठी यासाठी आहे कारण, बीसीसीआय लवकरच आयपीएलमधील दोन नव्या संघांची घोषणा करणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत आपण फक्त 8 संघांची चढाओढ पाहिली आहे. पण 2022 चा हंगाम थोडा वेगळा असेल, जिथे 8 नव्हे तर 10 संघ खेळताना दिसतील. दोन नवीन संघांसाठी, बीसीसीआयने 6 शहरांची निवड केली आहे, ज्यासाठी बोली सुरू आहे. (Race among 10 companies to buy new IPL teams, Manchester United owners leading Auction)
अहवालानुसार, दोन नवीन संघांसाठी 10 बोली लावण्यात आल्या आहेत. यापैकी अदानी ग्रुप, RPSG, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, ग्लेझर्स आणि अरुबिदों यांनी सर्वात महागड्या बोली लावल्या आहेत. अहवालांनुसार, अहमदाबाद, इंदूर आणि लखनौ येथून संघ खरेदी करण्यासाठी मोठी स्पर्धा आहे.
2 संघांसाठी 10 कंपन्यांनी बोली लावली आहे. या निविदांसाठी तपासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जो कोणी बीसीसीआयचे सर्व मापदंड पूर्ण करेल, तो संघाचा मालक बनण्याचा हक्कदार असेल. तांत्रिक बोलीची छाननी केल्यानंतर आर्थिक बोली खुली होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 ते 3.30 या वेळेत 2 नवीन संघांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
टीओआयच्या अहवालानुसार, मँचेस्टर युनायटेडचे मालक सध्या पुढील मोसमासाठी नवीन आयपीएल संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, एमएस धोनीचे कामकाज पाहणारी कंपनी रिती स्पोर्ट्सनेही आयपीएल संघ विकत घेण्यासाठी बोली लावल्याचे वृत्त आहे. या व्यतिरिक्त अमृत लीला एंटरप्रायझेस या कंपनीनेदेखील आयपीएल टीम खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. आयपीएल संघांच्या लिलावात या दोन कंपन्यांची बोली सर्वांना आश्चर्यचकीत करणारी ठरली आहे.
The stage is set! ? ?
Bidding for the 2⃣ new IPL teams to commence shortly! pic.twitter.com/Vsu58ZA83d
— BCCI (@BCCI) October 25, 2021
इतर बातम्या
India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल
T20 World Cup 2021 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडू शकतात, वाचा कसा, कुठे होऊ शकतो आमना-सामना
(Race among 10 companies to buy new IPL teams, Manchester United owners leading Auction)