एडिलेड: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची चांगली कामगिरी सुरु आहे. यात बॉलर्सच योगदान महत्त्वपूर्ण आहे. अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी हे भारताचे चारही वेगवान गोलंदाज मोक्याच्या क्षणी टीम इंडियाला विकेट मिळवून देतायत. वेगवान गोलंदाज तेव्हाच जबरदस्त गोलंदाजी करतात, जेव्हा त्यांना आराम मिळतो, ते फिट असतात.
आता दुखापत अजिबात परवडणार नाही
आपल्या फास्ट बॉलर्सची काळजी घेणं, कुठल्याही टीमसाठी महत्त्वाच असतं. कारण फास्ट बॉलर्सना दुखापतीचा धोका असतो. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. या स्टेजवर दुखापत अजिबात परवडणार नाही.
टीममधले सिनियर्स विशेष काळजी घेतायत
वर्ल्ड कपचे सामने एकापाठोपाठ एक सुरु आहेत. तीन-चार दिवसाच्या गॅपने सामना होतोय. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात सतत एका शहरातून दुसऱ्या शहरात हवाई प्रवास करावा लागतोय. अशावेळी खेळाडूंना प्रवासात दगदग होणं स्वाभाविक आहे. खासकरुन गोलंदाजांना जास्त त्रास होऊ नये, म्हणून टीममधले सिनियर्स विशेष काळजी घेतायत.
आपली सीट का दिली?
एडिलेडमध्ये होणाऱ्या सेमीफायनलपूर्वी हेड कोच राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने त्यांची बिझनेस क्लासची सीट मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याला दिली. बिझनेस क्लासच्या सीटमध्ये पाय पसरुन आरामदायक प्रवासाची सुविधा असते. यामुळे जास्त आराम मिळतो. म्हणून टीममधल्या सिनियर्सची आपली सीट गोलंदाजांना दिली. जेणेकरुन त्यांना जास्त आराम मिळेल. कारण पुढच्या मॅचमध्ये गोलंदाजांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे.
टीम इंडिया सेमीफायनलसाठी एडिलेडमध्ये दाखल झालीय. गुरुवारी इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलचा सामना होणार आहे. रविवारी टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील झिम्बाब्वे विरुद्धचा शेवटचा सामना जिंकला.
प्रत्येक टीमला बिझनेस क्लासच्या किती तिकीट्स मिळतात?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलच्या नियमानुसार, प्रत्येक टीमला बिझनेस क्लासच्या चार तिकीटस मिळतात. बहुतांश टीम या सीटस कोच, कॅप्टन, उपकर्णधार आणि मॅनेजरला देतात. भारतीय टीमला दस तिसऱ्या, चौथ्या दिवशी प्रवास करावा लागतोय. वेगवान गोलंदाजांना प्रवासात चांगली सीट मिळाली पाहिजे, हे टीम मॅनेजमेंटने आधीच ठरवलय. त्यामुळे या सीट्स गोलंदाजांना देण्यात आल्या.