राहुल द्रविडने जाता जाता विराट कोहलीला दिलं चॅलेंज, “लाल टिक कर म्हणजे..”

| Updated on: Jul 01, 2024 | 4:33 PM

राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर संपुष्टात आला आहे. प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाचा शेवट गोड झाला. जेतेपद मिळवल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट कोहलीकडे एक साकडं घातलं आहे. लाल टिक झाली की सर्वच मिळालं असं द्रविडने सांगितलं आहे. नेमकं काय आणि कशासाठी ते समजून घेऊयात

राहुल द्रविडने जाता जाता विराट कोहलीला दिलं चॅलेंज, लाल टिक कर म्हणजे..
Follow us on

टी20 वर्ल्डकप जेतेपदासोबत दिग्गज खेळाडूंची कारकिर्द संपली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. तर प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपला आहे. राहुल द्रविडने जाता जाता विराट कोहलीकडे एक मागणी ठेवली आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी शेवटचा ध्येय निश्चित केलं आहे. द्रविडने विराट कोहलीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचा आग्रह धरला आहे. विराट कोहलीने मर्यादीत षटकांच्या आयसीसी ट्रॉफीमध्ये झेंडा गाडला आहे. आता रेड बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्यास सांगितलं आहे. आयसीसीने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात राहुल द्रविड आपली म्हणणं मांडताना दिसत आहे. ‘पांढऱ्या चेंडूंच्या तीन स्पर्धेत टिकमार्क झालं आहे. आता एक रेडमार्क झालं पाहीजे.’ विराट कोहली वनडे वर्ल्डकप, टी20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवलेल्या संघाचा भाग होता. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मिळवून क्रिकेट कारर्किदीचा शेवट गोड व्हावा असं राहुल द्रविडला वाटत आहे.

राहुल द्रविडची हेड कोच म्हणून 2021 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. या कार्यकाळात भारतीय संघाने आयसीसी चषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मात्र जेतेपदाने हुलकावणी दिली. मात्र टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आणि जेतेपदावर नाव कोरलं. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने 2007 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप 1983, 2011 मध्ये जिंकला आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2002 आणि 2013 मध्ये पटकावली आहे.

राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. 6 जुलैला टीम इंडिया शुबमन गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाच्या प्रशिक्षपदाची भूमिका तात्पुरती सांभाळेल असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, गौतम गंभीर याचं नाव प्रशिक्षपदासाठी आघाडीवर आहे. टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर असताना ही घोषणा केली जाईल. या प्रशिक्षपदाचा कार्यकाळ 3.5 वर्षांचा असणार आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स, टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाला नव्या टीमसह बांधणी करावी लागणार आहे.