T20 World Cup मध्ये खराब कामगिरीनंतर राहुल गांधीचा विराटला सल्ला, म्हणाले…
टी20 विश्वचषकात सलग दोन सामने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ सध्या निराशामय असणार. अशावेळी कर्णधार विराटला आत्मविश्वास देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खास ट्विट केलं आहे.
1 / 4
भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात पूर्णपणे अपयशी होत असल्याचं दिसून येत आहे. संघात अव्वल दर्जाचे खेळाडू असतानाही भारताला सलग दोन सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळालं आहे. ज्यामुळे सर्वचजण भारतीय संघावर टीका करत आहेत. खासकरुन सर्व खापर कर्णधार विराटवर फुटत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक खास ट्विट करत विराटला दिलासा दिला आहे.
2 / 4
राहुल यांच्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, 'प्रिय विराट, हे लोक घृणा आणि तिरस्कार यांनी भरलेले आहेत. कारण यांना कोणी प्रेम करत नाही. पण त्यांना माफ करुन तू संघाला वाचव.'
3 / 4
सर्व संघाच्या तुलनेत विराट अधिक ट्रोल होण्यामागील कारण म्हणजे एकतर तो कर्णधार आहे. तसंच पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर मोहम्मद शमीवर त्याच्या धर्मावरुन टीका झाल्या असतानाही विराटने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काही विचित्र बुद्धिमतेच्या विराटला आणखीच ट्रोल केलं.
4 / 4
धक्कादायक म्हणजे शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटसह त्याची पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका यांच्याबद्दलही वाईट प्रतिक्रिया केल्या असल्याचं समोर आलं होतं.