मुंबई : बॉर्डर गावसकर सीरिजमधील पहिला सामना हा नागपूरमधील विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंना पहिल्या डावात स्वस्तात गुंडाळलं. त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल या सलामी जोडीने 76 धावांची भागीदारी केली. या दरम्यान टीम इंडियाच्या फलंदाजाने शानदार कामगिरी करत डबल धमाका केलाय. या फलंदाजाने द्विशतक ठोकलंय. त्यामुळे टीम मजबूत स्थितीत पोहचलीय.
रणजी ट्रॉफी 2022-23 चा सेमीफायनल सामना हा सौराष्ट्र विरुद्ध कर्नाटक यांच्यात खेळवण्यात येत आहे. मयंकने या निर्णायक सामन्यात द्विशतक ठोकलं. या द्विशतकाच्या जोरावर मयंकने टीमचा डाव सावरला. मयंक रणजी ट्रॉफीच्या या सत्रात सर्वाधिक 800 धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
मयंकने टीम इंडियासाठी 4 मधून 2 शतकांना द्विशतकात बदललंय. मयंकची कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ही 243 इतकी आहे. मयंकने 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. तर मयंक अखेरची टेस्ट मार्च 2022 मध्ये खेळलेला.
मयंकने या द्विशतकासह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित 2 सामन्यांसाठी दावेदारी सिद्ध केलीय. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांसाठीच भारतीय संघाची घोषणा केली आहे. त्यामुळे निवड समिती मयंकला संधी देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनिंगला डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा आले. पण दुसऱ्या ओव्हरमध्येच कांगारुंना पहिला धक्का बसला. उस्मान ख्वाजा एलबीडब्ल्यू झाला. मोहम्मद सिराज याने ख्वाजाला 1 रनवर आऊट केलं.
त्यानंतर लगेचच तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर सिराजनं धक्का दिला. डेविड वॉर्नरला आऊट केलं. दबावात असताना मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांनाी ऑस्ट्रेलिया डाव सावरला. तिसऱ्या विकेट्ससाठी 82 धावांची पार्टनरशीप केली. पण विकेटकीपर केएस भरत याने हुशारीने मार्नसला 49 रन्सवर स्टंपिंग केलं.
त्यानंतर आलेला मॅट रेनशॉ भोपळाही फोडू शकला नाही. जडेजाने एलबीडब्ल्यू केला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथ 37, एलेक्स कॅरी 36, पॅट कमिन्स 6, टोड मर्फी 0, पीटर हँडस्कॉम्ब 31, स्कॉट बोलँड 1 अशा धावा करून तंबूत परतले.
टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.