मुंबई: मुंबई आणि मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya pradesh) मध्ये रणजी करंडक 2022 (Ranji Trophy 2022) स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. बंगळुरुमध्ये ही अंतिम लढत खेळली जात आहे. आज दुसऱ्यादिवशी मुंबईच्या सर्फराज खानने (Sarfaraz Khan) शानदार शतक झळकावलं. आज सकाळच्या सत्रात मुंबईला तीन धक्के बसले. मात्र सर्फराज खानने त्या प्रतिकुल परिस्थितीतही मुंबईचा किल्ला लढवत ठेवला व शानदार शतक झळकावलं. त्याने 243 चेंडूत 134 धावा फटकावल्या. यात 13 चौकार आणि 2 षटकार आहेत. फायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यात शतक झळकावल्याने सर्फराज भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. शतकानंतर सेलिब्रेशन करताना त्याने हेल्मेट काढलं, त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी होतं. शिखर धवन स्टाइलमध्ये त्याने त्याचं शतक साजरं केलं. या रणजी सीजनमधलं त्याचं हे चौथ शतक आहे. फर्स्ट क्लास करीयरमधली ही आठवी सेंच्युरी आहे. बीसीसीआयने त्यांच्या टि्वटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केलाय.
? for Sarfaraz Khan! ? ?
हे सुद्धा वाचाHis 4⃣th in the @Paytm #RanjiTrophy 2021-22 season. ? ?
This has been a superb knock in the all-important summit clash. ? ? #Final | #MPvMUM | @MumbaiCricAssoc
Follow the match ▶️ https://t.co/xwAZ13U3pP pic.twitter.com/gv7mxRRdkV
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 23, 2022
सर्फराज खान आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. त्यांनी सुद्धा त्याच्या शतकाचा व्हिडिओ शेअर करताना 100 टक्के शुद्ध इमोशन्स असं कॅप्शन दिलं आहे. सर्फराजने आज 40 धावांवर डावपुढे सुरु केला व 152 चेंडूत अर्धशतक झळकावलं. अर्धशतकानंतर पुढच्या 38 चेंडूत त्याने 50 धावा ठोकल्या. त्यामुळे मुंबईला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला. त्याच्या शतकाच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात 374 धावांचा डोंगर उभा केला. सर्फराज शिवाय मुंबईकडून यशस्वी जैस्वालने 78 धावा केल्या.
✨ 100% Shuddh Emotions ✨pic.twitter.com/I8M4l6g6Qh
— Delhi Capitals (@DelhiCapitals) June 23, 2022
पहिल्यादिवस अखेर मुंबईच्या पाच बाद 248 धावा झाल्या होत्या. आज दुसऱ्यादिवशी मुंबईला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. शम्स मुलानीच्या रुपाने मुंबईला आज पहिला धक्का बसला. मुलानी कालच्या धावसंख्येवर 12 धावांवर बाद झाला. त्याला गौरव यादवने पायचीत पकडलं. त्यानंतर काल 40 धावांवर नाबाद असलेल्या सर्फराज खान आणि तनुष कोटियनने डाव पुढे नेला. त्यांनी आणखी 40 धावांची भर घातल्यानंतर कोटियनच्या रुपाने मुंबईचा सातवा गडी बाद झाला. त्याला सुद्धा गौरव यादवने 15 धावांवर क्लीन बोल्ड केलं.