मुंबई: दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी डेब्यु मॅचमध्येच कमाल केली. गोव्याच्या टीमकडून डेब्यु करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने पदार्पणाच्या सामन्यातच शतक ठोकलं. अर्जुन तेंडुलकरने राजस्थान विरुद्ध कमालीच शतक ठोकलं. 7 व्या नंबरवर अर्जुन फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने 2 सिक्स आणि 12 चौकारांच्या मदतीने शतक ठोकलं.
अखेर अर्जुनला मिळाली नशिबाची साथ
या शतकासोबतच अर्जुन तेंडुलकरने आपल्या वडिलांची बरोबरी केली. सचिनने सुद्धा 1988 साली रणजी डेब्यु मॅचमध्ये शतक ठोकलं होतं. अर्जुन तेंडुलकर मागच्या सीजनपर्यंत मुंबई टीममध्ये होता. तिथे भरपूर कॉम्पिटिशन होती. संधी मिळत नव्हती. त्यानंतर अर्जुनने टीम बदलली. त्याने गोव्या टीमकडून खेळण्याचा निर्णय घेतला. अखेर गोव्याच्या टीमकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरला नशिबाने साथ दिली.
हे शतक आत्मविश्वास देईल
हे शतक अर्जुन तेंडुलकरला खूप आत्मविश्वास देईल. अर्जुन तेंडुलकरच्या पुढच्या सामन्यांमधील कामगिरीवर आता लक्ष असेल. तिथे त्याने चांगलं प्रदर्शन केलं, तर कदाचित मुंबई इंडियन्सच्या टीममधून तो डेब्यु करु शकतो. आयपीएल 2022 च्या सीजनमध्ये अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून संधी मिळेल असं अनेकदा वाटत होतं. पण त्याला चान्स मिळाला नाही.