Ranji Trophy अजिंक्य रहाणे खेळतोय पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली, मुंबईचा सौराष्ट्राविरुद्ध सामना

| Updated on: Feb 17, 2022 | 11:00 AM

Ranji Trophy Mumbai vs Saurashtra: अजिंक्य रहाणेबरोबरच या सामन्यात सगळ्यांच्या नजरा चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीकडेही असतील.

Ranji Trophy अजिंक्य रहाणे खेळतोय पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली, मुंबईचा सौराष्ट्राविरुद्ध सामना
Follow us on

मुंबई: कोरोनामुळे (corona virus) बऱ्याच काळापासून बंद असलेल्या रणजी मोसमाला (Ranji Trophy) अखेर आजपासून सुरुवात झाली आहे. रणजी करंडक देशांतर्गत क्रिकेटमधील एक महत्त्वाची स्पर्धा आहे. रणजीमधून देशाला अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू मिळाले आहेत. यंदा रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. खरंतर रणजी करंडक स्पर्धा मागच्या महिन्यात सुरु होणार होती. पण ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या भितीमुळे रणजी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. यंदा रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 15 मार्च असा असणार आहे. दुसरा टप्पा IPL 2022 स्पर्धेनंतर सुरु होईल. आजपासून सुरु झालेल्या रणजी मोसमात मुंबईचा पहिला सामना सौराष्ट्राविरुद्ध होत आहे. पृथ्वी शॉ कडे मुंबईचे नेतृत्व आहे.

मीडियाचे या सामन्याकडे विशेष लक्ष

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि सौराष्ट्रामधल्या या रणजी लढतीकडे देशभरातल्या मीडियाचे लक्ष आहे. कारण या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे खेळत आहेत. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या या दोघांचा आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात समावेश होण्याची शक्यता कमी आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोघांना हरवलेला सूर शोधण्यासाठी रणजी कंरडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता.

रणजी मध्ये दमदार प्रदर्शन केल्यास निवड समितीकडून त्यांचा विचार होऊ शकतो. मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत दोघांनीही निराशाजनक प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे दोघांना संघातून डच्चू देण्याची मागणी होत आहे. अजिंक्य रहाणेला त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असलेल्या पृथ्वी शॉ च्या नेतृत्वाखाली खेळावं लागत आहे.

दोन फेजमध्ये रणजी स्पर्धा

रणजी करंडक स्पर्धेचं दोन फेजमध्ये आयोजन होणार आहे. पहिल्या फेजमध्ये 17 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान सामने होतील. रणजीच्या प्री क्वार्टर फायनलआधी तीन राऊंडचे सामने होतील. पहिला राऊंड 17 ते 20 फेब्रुवारी, दुसरा राऊंड 24 ते 27 फेब्रुवारी आणि तिसरा राऊंड 3 ते 6 मार्च दरम्यान खेळवला जाईल. दुसऱ्या फेजमध्ये नॉकाआऊट सामने होतील. 30 मे पासून दुसऱ्या फेजचे सामने सुरु होण्याची शक्यता आहे.