मुंबई: अनेक अडचणीतून जाणारा अफगाणिस्तान देशाच्या क्रिकेट प्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संघाचा सर्वात मातब्बर खेळाडू आणि जगातील अव्वल फिरकीपटू राशिद खानने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने तसं जाहीर करत सोशल मीडिया पोस्टही केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) गुरुवारी (9 सप्टेंबर) T20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) संघ जाहीर केला. त्यानंतर काही वेळातच राशिदने कर्णधारपदाता राजीनामा दिला आहे. राशिदने संघ निवडीदरम्यान माझ्याशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचं कारण देत राजीनामा दिला आहे.
राशिदने एक पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली त्याने पोस्टमध्ये राजीनाम्याचं कारणही लिहिलं आहे. त्याने लिहिलं आहे. ”मी संघाचा कर्णधार तसेच देशाचा एक नागरिकही आहे, असं असताना संघ निवडीदरम्यान माझ्याशी विचारविनीमय करणं गरजेचं होतं. पण असं काही झालं नाही निवड समिती आणि क्रिकेट बोर्डाने माझ्याशी कोणतीच चर्चा न केल्याने मी कर्णधार पद तात्काळ प्रभावाने सोडत आहे. अफगाणिस्तान देशासाठी खेळणं माझ्यासाठी कायम गर्वाची गोष्ट आहे. ”
??? pic.twitter.com/zd9qz8Jiu0
— Rashid Khan (@rashidkhan_19) September 9, 2021
राशिदच्या राजीनाम्यानंतर संघाचा दुसरा मातब्बर खेळाडू आणि अष्टपैलू क्रिकेटर मोहम्मद नबीने (Mohmmed Nabi) एक सूचक ट्विट केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, ”अशा अवघड वेळीही क्रिकेट संघ इतक्या मोठ्या स्पर्धेत भाग घेतोय याचं मी कौतुक करतो. आपण मिळून देशाला स्पर्धेत विजय मिळवून देऊ.” नबीच्या या सूचक ट्विटमुळे त्याला कर्णधारपद दिलं जाऊ शकतं, हे नक्की!
At this critical stage, I admire the decision of ACB for the announcement of leading the National Cricket Team in T20 Format. InshaAllah together we will present a great picture of the Nation in the upcoming T20 World Cup.
— Mohammad Nabi (@MohammadNabi007) September 9, 2021
टी- 20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघ :
इंग्लंड संघ :राशिद खान, रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), हजरतुल्लाह ज़ज़ाई, उस्मान गनी, असगर अफगान, मुहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, हसमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जनत, गुलबदीन नायब, नवीन उल हक, हमीद हसन, शराफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शापूर जादरान आणि कॅस अहमद.
हे ही वाचा :
T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण
(Rashid khan steps down as afghanistan captain before ICC mens t20 world cup)