मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना व्यवसायाबरोबरच क्रिकेटची सुद्धा आवड आहे. आयपीएल मधील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाची मालकी त्यांच्याकडे आहे. जागतिक क्रिकेट मधील विविध लीग स्पर्धांमध्येही त्यांनी रस दाखवला आहे. अलीकडेच मुकेश अंबानी यांनी दक्षिण आफ्रिकेत सुरु होणाऱ्या टी 20 लीग स्पर्धेतली एक संघ विकत घेतला. त्याचप्रमाणे UAE मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी 20 लीग मध्येही त्यांनी संघ विकत घेतलाय. मंगळवारी मुकेश अंबानी ‘द हंण्ड्रेड’ (The Hundred) लीग मधील सामना पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये उपस्थित होते. टी 20 च्या धर्तीवर ‘द हंण्ड्रेड’ ही इंग्लंड मध्ये खेळली जाणारी लीग स्पर्धा आहे. मुकेश अंबानी हा सामना पहायला उपस्थित असल्याने, आता ते ‘द हंण्ड्रेड’ मध्ये गुंतवणूक करणार आहेत का? नवीन फ्रेंचायजी विकत घेणार? अशी चर्चा सुरु झाली आहे.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ‘द हंण्ड्रेड’ मधील एकही फ्रेंचायजी अजून विकायला काढलेली नाही. ECB ने प्रत्येक आयपीएल फ्रेंचायजीला ‘द हंण्ड्रेड’ स्पर्धेत खेळणाऱ्या संघांमधील काही हिस्सा विकत घेण्याचा प्रस्ताव दिला होता, असं इंग्लिश माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झालं होतं. 2021 ची ही गोष्ट आहे. फक्त काही हिश्श्यावर मालकी हक्क मिळणार असल्यामुळे आयपीएल फ्रेंचायजींनी नकार दिला होता.
In the august company of two people who love their cricket @HomeOfCricket – Mr Mukesh Ambani and Mr @sundarpichai at @thehundred @SkyCricket pic.twitter.com/JYnkGlMd8W
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) August 9, 2022
आता अंबानी या स्पर्धेतील सामना पहायला हजर होते. त्यामुळे ते ‘द हंण्ड्रेड’ मध्ये गुंतवणूक करणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. फक्त अंबानीच नाही, जगप्रसिद्ध गुगल कंपनीचे CEO सुंदर पिचाई सुद्धा हा सामना पहायला उपस्थित होते. सुंदर पिचाई यांना सुद्धा क्रिकेटची आवड आहे. अमेरिका आणि अन्य लीग मधील संघ विकत घेणार, म्हणून त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती.