Ravichandran Ashwin : Live मॅचमध्ये अश्विनची सटकली, टीममधल्या सहकाऱ्यालाच मारायला निघाला, बघा VIDEO

| Updated on: Aug 02, 2024 | 9:33 AM

Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनला या मॅचमध्ये आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. संघ सहकाऱ्याच्या एका चुकीवर तो प्रचंड चिडला. त्याने बसल्या जागेवरुन उठून हात उचलण्याचा इशारा दिला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

Ravichandran Ashwin : Live मॅचमध्ये अश्विनची सटकली, टीममधल्या सहकाऱ्यालाच मारायला निघाला, बघा VIDEO
R Ashwin TNPL
Follow us on

टीम इंडियाचा दिग्गज स्पिनर-ऑलराऊंडर रविचंद्रन अश्विन क्रिकेटच्या मैदानात अनेकदा आक्रमक होतो. अनेकदा हे दिसून आलय. BCCI ने टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायला सांगितलय. इशान किशनसारखे प्लेयर याकडे दुर्लक्ष करतात. त्याचवेळी 37 वर्षाचा अश्विन आंतरराष्ट्रीय असो किंवा देशांतर्गत प्रत्येक सामना खेळायला तयार असतो. तामिळनाडूसाठी रणजी सामना असो किंवा लोकल क्लबची मॅच अश्विन तयार असतो. सध्या अश्विन TNPL मध्ये डिंडिगुल ड्रॅगन्सकडून खेळतोय. मॅच सुरु असताना भावना उचंबळून येणं स्वाभाविक आहे. TNPL च्या अशाच एका मॅचमध्ये अश्विनला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. अश्विन इतका चिडला की, सगळेच हैराण झाले.

टीएनपीएलमध्ये अश्विन डिंडिगुलचा कॅप्टन आहे. या टुर्नामेंटमध्ये तो दमदार प्रदर्शन करतोय. या स्पर्धेत ओपनिंग करताना तो दमदार फलंदाजी करतोय. चेपॉकवर सुपर गिलीज विरुद्ध एलिमिनेटर मॅचमध्ये त्याने अशीच कमाल दाखवली. आपल्या टीमला विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. या मॅचमध्ये एका प्रसंगात टीम अडचणीत होती. त्यावेळी अश्विन प्रचंड संतापला. सहकाऱ्यावरच त्याने हात उचलण्याचा इशारा केला. अश्विनच हे रुप पाहून सगळेच हैराण झाले.

अश्विन का चिडला?

अश्विनची टीम डिंडिगुल 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होती. अश्विन तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला आला. त्याने वेगाने धावा जमवल्या. टीमला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं. 14 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर तो आऊट झाला. डिंडिगुलचा हा दुसरा विकेट होता. टीमला 30 चेंडूत विजयासाठी 44 धावांची गरज होती. अश्विन बाद होऊन डग आऊटमध्ये गेला होता. त्याचवेळी धावा घेण्यावरुन शिवम सिंह आणि बाबा अपराजितमध्ये गोंधळ उडाला. अपराजित पहिल्या चेंडूवर रनआऊट झाला. 2 चेंडूत 2 विकेट गेले. अश्विन समोरच हे घडलं. तो प्रचंड संतापला. आपल्या जागेवरुन उठून त्याने संताप व्यक्त केला. मारण्याचे हातवारे इशारे सुद्धा केले.


अश्विन फक्त शब्दानीच बोलला नाही. त्याने आक्रमक हातवारे केले. मारहाणीचा इशारा केला. काही सेकंद हे सुरु होतं. हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.