Marathi News Sports Cricket news Ravichandran Ashwin need one wicket to complete 250 T20 Wickets, Sanju Samson one step away to complete his 100 Sixes
IPL 2021 : DC vs RR : आजचा सामना अश्विन आणि सॅमसनसाठी खास, दोघांकडे मोठ्या विक्रमाची संधी
आज सर्वांच्या नजरा दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज रवीचंद्रन अश्विन (Ashwin) आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन Sanju Samson) यांच्यावर असतील. हे दोन्ही खेळाडू मोठा विक्रम करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत.
1 / 3
आयपीएल 2021 मध्ये आज अबू धाबीच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये सामना खेळवला जात आहे. राजस्थानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही संघांनी त्यांचा मागील सामना जिंकला आहे. ज्या पद्धतीने राजस्थानने पंजाब किंग्जचा पराभव केला, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढला असेल. अशा स्थितीत अबू धाबी येथे होणाऱ्या आज च्या सामन्यात मोठी चुरस पाहण्याची संधी मिळणार आहे. आजच्या सामन्यात काही विक्रमही केले जातील. आज सर्वांच्या नजरा दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज रवीचंद्रन अश्विन (Ashwin) आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन Sanju Samson) यांच्यावर असतील. हे दोन्ही खेळाडू मोठा विक्रम करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत.
2 / 3
आर अश्विनला हवी केवळ 1 विकेट : दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज आर. अश्विन टी - 20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्सपासून फक्त एक विकेट दूर आहे. जर त्याने आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध 1 विकेट घेतली, तर तो टी - 20 मध्ये 250 विकेट घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरेल. अमित मिश्रा आणि पियूष चावला यांनी त्याच्या आधी हा विक्रम केला आहे.
3 / 3
संजू सॅमसनला हवा केवळ 1 षटकार : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या नावावर 99 षटकार आहेत. त्याने आजच्या सामन्यात एक षटकार मारताच आयपीएलमध्ये 100 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश होईल. जर सॅमसनने आज दिल्लीविरुद्ध षटकार ठोकला तर तो राजस्थानसाठी 100 षटकार ठोकणारा शेन वॉटसन नंतरचा दुसरा खेळाडू असेल.