Warm-Up Match: टीम इंडिया हरली, पण अश्विनने 6 चेंडूत पलटला खेळ

| Updated on: Oct 13, 2022 | 3:34 PM

Warm-Up Match: पहिल्या 3 ओव्हरमध्ये अश्विन महागडा ठरला. पण चौथ्या ओव्हरमध्ये त्याने असं काय केलं?

Warm-Up Match: टीम इंडिया हरली, पण अश्विनने 6 चेंडूत पलटला खेळ
ashwin
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई: टी 20 वर्ल्ड कप (T20 World cup) आधी टीम इंडिया सराव सामने खेळत आहे. आज वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (IND vs WI) विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात टीम इंडियाचा (Team India) 36 धावांनी पराभव झाला. टीम इंडिया हरली पण या मॅचमध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला गोलंदाजांनी 8 बाद 168 धावांवर रोखलं. एकवेळ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच सुरु होती.

टीम इंडियाचा बेस्ट बॉलर ठरला

रविचंद्रन अश्विनच्या फिरकीने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अश्विन दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियाचा बेस्ट बॉलर ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.

पहिल्या 3 ओव्हरमध्ये महागडा ठरला होता

अश्विन आपल्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये महागडा ठरला होता. त्याने 30 धावा दिल्या होत्या. पण अश्विनने शेवटच्या ओव्हरमध्ये खेळच पलटला. अश्विनने या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा देऊन 3 विकेट काढल्या. अश्विनने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट काढला.

अश्विनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण

त्याच्याकडे हॅट्रिक घेण्याची संधी होती. पण त्याला ती संधी साधता आली नाही. चौथ्या चेंडूवर पुन्हा त्याने विकेट घेतला. या कामगिरीनंतर अश्विनने वर्ल्ड कपच्या प्लेइंग 11 साठी आपला दावा मजबूत केला आहे. युजवेंद्र चहल असताना अश्विनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं तसं कठीण दिसतय. पण तरीही त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केलीय.

हर्षल पटेलची चांगली कामगिरी

हर्षल पटेल पहिल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये फ्लॉप ठरला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. या मध्यमगती गोलंदाजाने 4 ओव्हरमध्ये 27 धावा देऊन 2 विकेट काढल्या. अर्शदीप सिंहने 3 ओव्हरमध्ये 25 रन्स देऊन एक विकेट काढल्या. अर्शदीपने पुन्हा एकदा आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट काढला. भुवी, हार्दिक, हुड्डा आणि अक्षर पटेल एकही विकेट काढू शकले नाहीत.