मुंबई: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) काल आयपीएल फायनलमध्ये पोहोचून 14 वर्षांचा वनवास संपवला. राजस्थानने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) पहिल्या सीजनमध्ये 2008 साली फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली आयपीएलचं पहिलं विजेतेपदही या संघाने पटकावलं होतं. त्यानंतर काल क्वालिफायर 2 च्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (RCB) नमवून राजस्थान रॉयल्सने दुसऱ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली. बटलरने षटकार ठोकून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांसह क्रिकेटपटूच्या कुटुंबियांनीही एकच जल्लोष केला. राजस्थानने RCB वर विजय मिळवला, त्यावेळी रविचंद्रन अश्विनची पत्नी प्रीति आणि रासी वॅन डर डुसेची बायको लारा तिथे उपस्थित होती. राजस्थान रॉयल्सच्या प्रत्येक सामन्याच्यावेळी दोघी एकत्र दिसतात.
राजस्थानने विजय मिळवताच, दोघींनी एकच जल्लोष केला. दोघींनी एकमेकींची गळाभेट घेतली व तिथेच त्यांनी नाचायला सुरुवात केली. त्यांच्या विजयाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. राजस्थान रॉयल्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेयर केलाय.
आतापर्यंत 10 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय. प्रीति आणि लारा राजस्थानच्या प्रत्येक सामन्याच्यावेळी प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेल्या दिसायच्या. राजस्थानला संघाला त्यांचा सपोर्टही दिसायचा. राजस्थान रॉयल्सने काल क्वालिफायर 2 च्या सामन्यात आरसीबीवर 7 विकेट राखून विजय मिळवला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 157 धावा केल्या. राजस्थानने जोस बटलरच्या शानदार शतकाच्या बळावर हे लक्ष्य आरामात पार केलं. आता फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे.
लारा वॅन डर डुसे ही दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू रासी वॅन डर डुसेची बायको आहे. प्रेक्षक स्टँडमध्ये ती नेहमी राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करताना दिसते. काल राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्टमध्ये तिने जोस बटलरला दुसरा नवरा म्हणून स्वीकारल्याच वक्तव्य केलं. तिने असं का म्हटलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जोस बटलर जेव्हा मोठे फटके खेळतो किंवा एखादा रेकॉर्ड करतो, तेव्हा कॅमरा प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांकडे जातो. त्यावेळी अनेकांना लारा वॅन डर डुसे जोस बटलरची बायको वाटते. राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्टमध्ये बोलताना लाराने हा गोंधळ दूर केला, गमतीने तिने यावेळी जोसला दुसरा नवरा म्हणून स्वीकारल्याचं सांगितलं.