IND vs WI: भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू वेस्ट इंडिज सीरीजला मुकणार?

| Updated on: Jan 26, 2022 | 4:08 PM

तो पूर्णपणे फिट नाहीय. श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारे तो संघात पुनरागमन करु शकतो. ही सीरीज फेब्रुवारीच्या शेवटास होणार आहे.

IND vs WI: भारताचा हा स्टार खेळाडू वेस्ट इंडिज सीरीजला मुकणार?
ड्वेन ब्राव्हो
Follow us on

नवी दिल्ली: टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) अद्यापही दुखापतीमधून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे टीम इंडियामधील (Indian Cricket Team) त्याचं पुनरागमन आणखी लांबणीवर जाऊ शकतं. टी-20 वर्ल्डकपपासूनच रवींद्र जाडेजा संघाबाहेर आहे. तो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. या दुखापतीमुळेच रवींद्र जाडेजा न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. या दुखापतीमुळेच जाडेजाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात (South Africa Tour) संघात समावेश करण्यात आला नव्हता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-20 सीरीजपर्यंतही रवींद्र जाडेजा फिट होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तो या मालिकेत सुद्धा खेळताना दिसणार नाही.

रवींद्र जाडेजा अजूनही दुखापतीमधून सावरण्याचा प्रयत्न करतोय. तो पूर्णपणे फिट नाहीय. श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेद्वारे तो संघात पुनरागमन करु शकतो. ही सीरीज फेब्रुवारीच्या शेवटास होणार आहे. या मालिकेतही जाडेजा दिसला नाही, तर तो थेट आयपीएल 2022 मध्ये खेळताना दिसेल. आयपीएलमध्ये जाडेजा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो. धोनीच्या नंतर CSK च्या कॅप्टनशिपसाठी त्याचेच नाव आघाडीवर आहे. दी न्यू इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे.

…तर या युवा खेळाडूंना मिळेल संधी
वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी-20 सामने 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोलकात्यामध्ये होणार आहेत. यापूर्वी सहा ते नऊ फेब्रुवारी दरम्यान तीन वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. ही मालिका अहमदाबादमध्ये खेळली जाणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेसाठी जाडेजाची संघात निवड झाली नाही, तर त्याच्याजागी अक्षर पटेल आणि क्रुणाल पटेल या खेळाडूंची निवड होऊ शकते. वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा येत्या एक-दोन दिवसात होणार आहे. टी-20 सीरीजमध्ये आवेश खान आणि हर्षल पटेल सारख्या वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते.