मुंबई : यंदाच्या आईपीएलसाठीही धोनीला चेन्नईने रिटेन केलं आहे. धोनीबरोबरच अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजालाही चेन्नईनं रिटेन केलं आहे. तर मागील आयपीएलमध्ये दमदार कागिरीने सर्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ऋतुराज गायकवाडलाही रिटेन केलं आहे. या खेळाडुंना मिळालेली रक्कम मात्र विचार करायला भाग पाडणारी आहे. आणि त्याला कारण ठरलं आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून धोनीला, मुंबईकडून रोहित शर्माला आणि आरसीबीकडून विराट कोहलीला मिळालेली वेगवेगळी रक्कम आणि त्यातला फरक.
रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे
रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीला मिळालेली रक्कम चाहत्यांना विचार करायला भाग पाडणारी आहे. कारण यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त म्हणजे एकूण तब्बल 16 कोटी मिळणार आहेत तर महेंद्रसिंह धोनीला यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी 12 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना हादरा बसला आहे. धोनीची प्रचंड लोकप्रियता आणि चेन्नईकडून इतकेदिवस केलेली जबरदस्त कॅप्टन्सी पाहून चाहत्यांना आपसूकच धोनीला सर्वात जास्त पैसे मिळतील असं वाटत होतं, प्रत्यक्षात मात्र झाल उलट धोनीला पहिल्या स्थानी रिटेन करता दुसऱ्या स्थानी रिटेन केल्यानं रवींद्र जडेजापेक्षा कमी पैसे मिळाले आहेत. जडेजापेक्षा कमी रक्कम विराट कोहलीलाही मिळाली आहे. कोहलीला यंदाचं आयपीएल खेण्यासाठी 15 कोटी मिळाले आहेत. रोहित शर्माने धोनी आणि कोहलीला मागे टाकत 16 कोटींपर्यंत मजल मारली आहे. तर आयपीएलमध्ये चमकदार फलंदाजी करून सर्वांच लक्ष वेधणाऱ्या ऋतुराज गायकवाडला 6 कोटी रुपये देऊन रिटेनं केलं आहे. ही आकडेवारी नक्कीच्या धोनी आणि कोहलीच्या फॅन्सना चकीत करणारी आहे.