IND vs ENG 2nd Test | पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा अनपेक्षित पराभव झाला. टीम इंडियासाठी हा मोठा झटका आहे. कारण कसोटीच्या तिन्ही दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडियाचा चौथ्या दिवशी पराभव झाला. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंड 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाकडे मालिकेत अजूनही पुनरागमन करण्याची संधी आहे. चार कसोटी सामने बाकी आहेत. पण त्याआधी टीम इंडियाला दुखापतीच ग्रहण लागलय. टीम इंडियाचे अव्वल दोन खेळाडू दुखापतीमुळे पुढच्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीयत. केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा हे दुखापतीमुळे खेळणार नाहीयत. आधीच मालिकेत पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. कारण हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये होते. त्यांची जागा भरुन काढण सोप नाहीय.
टीम इंडियासाठी हा धक्का असताना आणखी एक वाईट बातमी आहे. रवींद्र जाडेजा मालिकेतील उर्वरित चारही कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. कारण त्याला झालेली दुखापत गंभीर आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय. केएल राहुल तिसऱ्या कसोटीपासून टीममध्ये खेळताना दिसू शकतो. पण रवींद्र जाडेजाची दुखापत गंभीर आहे. बंगळुरुतील NCA मधील मेडीकल टीम काय बोलते? त्यावर बरच काही अवलंबून आहे, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं. हैदराबाद कसोटीच्या चौथ्यादिवशी वेगात रन्स पळून काढताना रवींद्र जाडेजाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली.
कुठले प्लेयर्स आधीच बाहेर आहेत?
रवींद्र जाडेजा संपूर्ण सीरीजला मुकला, तर तो टीम इंडियासाठी आणखी एक मोठा झटका ठरेल. कारण विराट कोहली, केएल राहुल आणि मोहम्मद शमी हे प्रमुख प्लेयर बाहेर आहेत. बीसीसीआयने राहुलच्या जागी सर्फराज खानचा स्क्वाडमध्ये समावेश केला आहे. त्याशिवाय रजत पाटीदार आणि ध्रुव जुरैल सुद्धा टीममध्ये आहेत. आता या तिघांपैकी एकाला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीममध्ये संधी मिळू शकते.