बंगळुरु : वर्ल्ड क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला विराट कोहली असा एकमेव खेळाडू आहे, ज्याची प्रत्येक फॉर्मेटमध्ये बॅट चालते. दुसरे सुद्धा मोठे खेळाडू आहेत, पण ते एकाच फॉर्मेटमध्ये जास्त चांगले खेळतात. विराट कोहली टेस्ट, वनडे आणि टी 20 तिन्ही फॉर्मेटमध्ये खोऱ्याने धावा करतो. सध्या विराट कोहली वर्ल्ड कपच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. भारताला पुन्हा वर्ल्ड चॅम्पियन बनवणं हेच कोहलीसमोरच सध्याच मुख्य लक्ष्य आहे. यावेळी टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली, तर विराट वनडे आणि टी 20 या दोन्ही फॉर्मेटमधून निरोप घेऊ शकतो. वर्ल्ड क्रिकेटमधील महान फलंदाज आणि विराट कोहलीचा जवळचा मित्र एबी डिविलियर्सने हे म्हटलय. विराट कोहली कधी निवृत्त होणार? असा प्रश्न एबी डिविलियर्सला विचारण्यात आला. त्यावर त्याने आपल मत व्यक्त केलं.
“2027 चा वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी विराट कोहलीची दक्षिण आफ्रिकेला यायची इच्छा असेल. पण असं होईल किंवा नाही हे आता सांगण कठीण आहे. 2027 अजून लांब आहे. तुम्ही विराटला विचारलं, तर तो सुद्धा तुम्हाला हेच सांगेल” असं एबी डिविलियर्स म्हणाला. डिविलियर्स यानंतर जे बोलला, त्यामुळे विराट कोहलीच्या लाखो-कोट्यवधील फॅन्सच मन मोडलं. “टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप जिंकला, तर वनडे आणि टी 20 मधून निरोप घेण्यासाठी विराटकडे यापेक्षा चांगली संधी नसेल. विराट कोहली पुढची काही वर्ष कसोटी क्रिकेट खेळू शकतो. यात आयपीएल सुद्धा आहे” असं एबी डिविलियर्स त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला. एबी डिविलियर्सच विराटबद्दलच हे मत ऐकून सहाजिकच लाखो फॅन्सच मन मोडलं असणार.
फक्त वर्कलोड मॅनेज करण्याची गरज
विराट कोहली 2023 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेऊ शकतो, असा डिविलियर्सचा अंदाज आहे. विराट कोहलीचा वर्कलोड नीट मॅनेज केला, तर हा खेळाडू 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा खेळू शकतो. विराट कोहलीचा फिटनेस कमालीचा आहे. तो आरामात वयाच्या 40 पर्यंत क्रिकेट खेळू शकतो. विराट अजून 3-4 वर्ष आरामात वनडे आणि टी 20 क्रिकेट खेळू शकतो.