RCB IPL 2023 : IPL 2023 च्या निमित्ताने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या सर्वत्र एकत्र दिसतायत. दोघांच्या डान्स, मजा, मस्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयपीएल मॅचच्यावेळी अनुष्का प्रेक्षक स्टँडमधून विराटला चिअर करताना दिसते. मॅच नंतर हे कपल एकत्र फिरताना दिसतय. विराट आणि अनुष्का दोघेही सेलिब्रिटी असल्याने त्यांची फॅन फॉलोइंग मोठी आहे. त्यामुळे हे कपल सार्वजनिक ठिकाणी दिसताच, त्यांना पाहण्यासाठी एकच झुंबड उडते.
या जोडीसोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांमध्ये चढा-ओढ लागलेली असते. बंगळुरुत गर्दीमध्ये दोघे सापडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात विराट कोहली भडकल्याच दिसतय.
बातमी आगीसारखी पसरली
आरसीबीच्या सामन्यांच्या निमित्ताने विराट कोहली बंगळुरुमध्ये आहे. तो आणि अनुष्का दोघे बंगळुरुतल्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते. बंगळुरुतल्या प्रसिद्ध CTR उपहारगृहात दोघांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. यावेळी दोघे CTR मध्ये असल्याची बातमी आगीसारखी पसरली. मग काय? दोघांना पाहण्यासाठी हॉटेलबाहेर चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती.
Virat Kohli got mobbed in Bengaluru ?❤️? after lunch date with Anushka nd family . pic.twitter.com/JYHNtDaYMo
— “ (@KohlifiedGal) April 22, 2023
विराट कोहली इतका का वैतागला?
हॉटेलमधूनम बाहेर पडताना विराट, अनुष्काची चांगलीच तारांबळ उडाली. कारपर्यंत पोहोचताना त्यांना नाकीनऊ आले. दोघांना चाहत्यांनी घेरले होते. चाहते फोटोसाठी विनंती करत होते. उपहरागृहाबाहेरचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात विराट चाहत्यावर वैतागल्याच दिसतय. सुरक्षाकड भेदून हा चाहता अनुष्कासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होता. म्हणून विराट कोहली त्याच्यावर वैतागला.
गर्दीला कुठलीही शिस्त नव्हती. त्यामुळे विराटचा पारा चांगलाच चढला. तो चाहत्याला अनुष्कापासून लांब व्हायला सांगत होता.