IPL ला यंदा नवा विजेता मिळणार?, असं आहे सध्याचं गणित, सर्व संघाची स्थिती एका क्लिकवर

| Updated on: Sep 28, 2021 | 3:36 PM

आयपीएलचा 14 वा हंगांम हळूहळू अंतिम सामन्याच्या दिशेने सरसावत आहे. सर्व संघाचे केवळ 4 सामने शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर अव्वल चार संघ प्लेऑफमध्ये सामिल होतील.

IPL ला यंदा नवा विजेता मिळणार?, असं आहे सध्याचं गणित, सर्व संघाची स्थिती एका क्लिकवर
आयपीएल
Follow us on

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2021)  या जगातील धमाकेदार क्रिकेट लीगचा 14 वा हंगाम सध्या सुरु आहे. ज्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक या वर्ल्ड फेमस लीगचे सामने एन्जॉय करत आहेत. दररोज काही हटके निकाल समोर येत असल्याने सर्वच हैराण होत आहेत. पाच वेळा खिताब विजेता मुंबईचा संघ (Mumbai Indians) यंदा दुसऱ्या पर्वात सलग तीन सामने पराभूत झाला आहे. त्यात दरवर्षी खराब कामगिरी करणारा विराट कोहलीचा (Virat Kohli) आरसीबी संघ यंदा गुणतालिकेत टॉप 4 मध्ये आहे.

दरम्यान या सर्व निर्णयांमुळे यंदा आयपीएलच्या ट्रॉफीला नवा संघ मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण टॉप 4 मध्ये असणाऱ्या संघात दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) हे दोन्ही संघ आहेत. या दोघांनी आतापर्यंत एकदाही चषक जिंकला नसून दोघांचा यंदाचा खेळ पाहता त्यांच्यापैकी एक संघ जिंकण्याची दाट शक्यता आहे.

कोण कोणत्या स्थानावर?

आतापर्यंत झालेल्या सामन्यात गुणतालिकेचा (IPL Points Table) विचार करता धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ सर्वात अव्वल स्थानी आहे. त्यांनी 10 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. त्यानंतर रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 10 पैकी 8 सामने जिंकून 16 गुण मिळवले आहेत. पण रनरेट चेन्नईचा अधिक असल्याने ते पहिल्या तर दिल्ली दुसऱ्या स्थानी आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आहे. त्यांनी 10 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत.

त्यानंतर केकेआर, पंजाब किग्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स हे सर्व संघ 10 पैकी 4 सामने जिंकत अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर 8 गुणांसह विराजमान आहेत. यांच्यामध्ये रनरेटचा फरक आहे. तर  सनरायझर्स हैद्राबादचा संघ 10 पैकी दोन सामने जिंकत 4 गुणांसह सर्वात शेवटी आठव्या स्थानावर आहे.

सर्व गुणतालिका सविस्तर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा

IPL 2021: अखेर सनरायजर्सचा ‘विजयी सूर्य’ उगवला, राजस्थान संघावर 7 गडी राखून मात

Hardik Pandya : चांगल्या लयीत नसल्याने हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातून बाहेर पडणार?, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता

IPL 2021: आरसीबीच्या दमदार विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये सर्व आनंदी, एबी डिव्हिलीयर्सने केली विराटची नकल, पाहा VIDEO

(RCB or DC will may win this IPL 2021 So new Winner will enter in IPL trophy winners list)