मुंबई: आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाला (IPL 2021) युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यासाठी सर्वचजण उत्सुक असून खेळाडूही युएईला पोहोचले आहेत. विलगीकरण संपवून खेळाडू सरावात व्यस्त असताना संघ व्यवस्थापनांनी देखील संघातील आवश्यक बदल करुन नवे संघ जाहीर केले आहेत. दरम्यान यंदाच्या आय़पीएलमध्ये सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी करत विराट कोहलीची (Virat Kohli) रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) ही टीम गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आपल्या धमाकेदार खेळासोबतच आता आरसीबी त्यांच्या नव्या रंगाच्या जर्सीमुळेही चर्चेत आली आहे. आरसीबीने निळ्या रंगातील जर्सीचा फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत याची माहिती दिली. तसेच या रंगामागील कारणही सांगितले.
आरसीबी दुसऱ्या पर्वातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाविरुद्ध खेळणार आहे. यावेळी ते त्यांच्या नेहमीच्या लाल जर्सीत दिसणार नसून निळ्या रंगाची जर्सी घालणार आहेत. या जर्सीचा रंग पीपीई किटला उद्दशून असल्याने कोरोनाच्या संकटात पीपीई किट घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना पाठिंबा म्हणून ही जर्सी घालणार आहेत. आरसीबीने या बद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
RCB to wear Blue Jersey v KKR on 20th
We at RCB are honoured to sport the Blue kit, that resembles the colour of the PPE kits of the frontline warriors, to pay tribute to their invaluable service while leading the fight against the Covid pandemic.#PlayBold #1Team1Fight pic.twitter.com/r0NPBdybAS
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 14, 2021
आरसीबी संघाने सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणाऱ्या श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याला करारबद्ध केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या जागी हसरंगाला घेण्यात आलं आहे. हसरंगासह श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू यासह दुष्मंथा चमिरा यालादेखील आरसीबीने संघात घेतलं आहे. तो केन रिचर्डसनच्या बदली खेळणार आहे. तर टीम डेव्हिड हा फिन एलनला रिप्लेस करणार आहे. तर केन रिचर्डसनला जिओर्जी गार्टोन बदली खेळाडू म्हणून खेळणार आहे.
United to help and support the frontline warriors who have worked selflessly and tirelessly to fight the Covid Pandemic. ????
We are #1Team1Fight! ??#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 #KKRvRCB pic.twitter.com/W7fMXnvwrL
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 14, 2021
– 20 सप्टेंबर (सोमवार): आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी
– 24 सप्टेंबर (शुक्रवार): आरसीबी vs चेन्नई सुपरकिंग्स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह
– 26 सप्टेंबर (रविवार): आरसीबी vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
– 29 सप्टेंबर (बुधवार): आरसीबी vs राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
– 03 ऑक्टोबर (रविवार): आरसीबी vs पंजाब किंग्स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह
– 06 ऑक्टोबर (बुधवार): आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी
– 08 ऑक्टोबर (शुक्रवार): आरसीबी vs दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई
हे ही वाचा-
विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत सस्पेन्स संपला, BCCI सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य!
T20 World Cup पूर्वी जागतिक क्रिकेटमधील स्टार खेळाडूची निवृत्ती, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
(RCB reveals new blue colour jersy for kkr match to give credit for frontline workers)