IPL 2024 | आयपीएलमध्ये काही खेळाडूंनी अशी छाप उमटवलीय की, त्यांना कधीही विसरता येणार नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एकाच टीमशी संबंधित राहिल्यामुळे हे खेळाडू त्या टीमच्या फॅन्सच्या कायम लक्षात राहतात. उदहारणार्थ कायरन पोलार्ड. मुंबई इंडियन्सचे फॅन्स पोलार्डला कधीच विसरु शकत नाहीत. असच समीकरण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममधील एका प्लेयरच आहे. हा प्लेयर खास आहे. त्याच्या टॅलेंटबद्दल मनात अजिबात शंका नाही. त्याला टीम इंडियात कायम स्थान मिळालं नाही. पण संधी मिळाली, तेव्हा त्याने आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अगदी शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन या प्लेयरने टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. RCB कडून खेळतानाही अनेकदा त्याने संकटाच्या स्थितीतून टीमला बाहेर काढलय.
हा प्लेयर दुसरा-तिसरा कोणी नसून दिनेश कार्तिक आहे. 38 वर्षीय कार्तिकचा आयपीएलमधील हा शेवटचा सीजन असणार आहे. दिनेश कार्तिकची आणखी एक खासियत म्हणजे आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली, तेव्हापासून प्रत्येक सीजनमध्ये दिनेश कार्तिक खेळलाय. आयपीएल करिअरमध्ये दिनेश कार्तिक सहा वेगवेगळ्या फ्रेंचायजींकडून खेळला. दिल्ली कॅपिटल्स, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि आरसीबी या टीमकडून दिनेशने मैदान गाजवलं.
त्या सीजनमध्ये 183 च्या स्ट्राइक रेटने धावा
या संपूर्ण प्रवासात दिनेश कार्तिक फक्त दोन सामन्यांना मुकला. यावरुन त्याची टीम, आयपीएलबद्दलची कटिबद्धता दिसून येते. ESPNcricinfo नुसार या सीजननंतर दिनेश कार्तिक रिटायर होईल. दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 च्या सीजनमध्ये जबरदस्त खेळ दाखवला. फिनिशरचा रोल परफॉर्म करताना 183 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा चोपल्या. या सगळ्या प्रवासात अनेक चढ-उतार अनुभवले. काही सीजनमध्ये संघर्ष करावा लागला. 2022 सालच्या परफॉर्मन्समुळे त्या वर्षी झालेल्या T20 वर्ल्ड कपसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली.