मुंबई : RCB चा प्रमुख खेळाडू विराट कोहलीने काल यशस्वी जैस्वालची शानदार इनिंग पाहिल्यानंतर त्याचं कौतुक करणारी स्टोरी पोस्ट केली होती. यशस्वी जैस्वालने काल तुफानी बॅटिंग केली. त्याने 47 चेंडूत नाबाद 98 धावा फटकावल्या. यात 12 फोर आणि 5 सिक्स होते. त्याच्या बॅटिंगच्या बळावरच राजस्थानर रॉयल्सने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध विजय मिळवला. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून रहाण्याच्या दृष्टीने राजस्थानसाठी विजय आवश्यक होता.
विराट कोहलीला यशस्वी जैस्वालची बॅटिंग खूप आवडली. त्याने आधी त्याच्या इन्स्टाग्रामवर यशस्वीच कौतुक करणारी स्टोरी पोस्ट केली होती. पण नंतर त्याने ती डिलीट केली.
विराटने ती स्टोरी डिलीट का केली?
विराटने यशस्वीच कौतुक करणारी स्टोरी शेयर केली, तेव्हा त्यावर जिओ सिनेमा लिहिलेलं होतं. पण काही सेकंदातच विराटने ती स्टोरी डिलीट केली. कोहलीने त्यानंतर जिओ सिनेमा नाव नसलेली दुसरी पोस्ट रिशेअर केली.
Virat Kohli deleted the earlier Instagram story just to crop Jio Cinema ?? #YashasviJaiswal
earlier just now pic.twitter.com/mKnX3vrYFc
— Akshat (@AkshatOM10) May 11, 2023
RCB सुपरस्टार विराट कोहली IPL 2023 साठी स्टार स्पोर्ट्सचा ब्रँड अॅम्बेसडर आहे. लाइव्ह स्ट्रिमिंगमध्ये जिओ सिनेमा स्टार स्पोर्ट्सची स्पर्धक आहे. जिओ सिनेमा या नावामुळे कोहली अडचणीत आला असता.
विराटने पोस्टमध्ये काय लिहिलेले?
यशस्वी जैस्वालने काल आयपीएलच्या इतिहासातील वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याने 13 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकवली. “अलीकडे, मी पाहिलेली ही सर्वोत्तम बॅटिंग आहे. यशस्वी जैस्वालकडे टॅलेंट आहे” अशा शब्दात विराटने त्याच्या पोस्टमधून राजस्थानच्या युवा ओपनरच कौतुक केलं. कोहलीच्या पोस्टमधील चूक लक्षात येताच, नेटीझन्सनी कमेंट सुरुवात केली. कोहलीला स्टार स्पोर्ट्स बरोबरचा कॉन्ट्रॅक्ट धोक्यात आलाय, असं एक युजरने म्हटलं होतं. आपली चूक लक्षात येताच विराटने ती पोस्ट डिलीट करुन नवीन पोस्ट केली.