मुंबई: पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर आयपीएलमधला 49 वा सामना सुरु आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये (CSK vs RCB) हा सामना होत आहे. . चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये आठ बाद 173 धावा केल्या आहेत. बँगलोरसाठी विराट कोहली (Virat kohli) आणि फाफ डू प्लेसिसने चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. डू प्लेसिसच्या रुपाने बँगलोरचा पहिला विकेट गेला. त्याने 38 धावा केल्या. मोइन अलीच्या गोलंदाजीवर जाडेजाने त्याला झेल घेतला. आरसीबीला सलग तीन पराभवानंतर आज विजय आवश्यक आहे.
विराट कोहलीला आज सूर गवसलाय असं वाटत होतं. तो फॉर्ममध्ये दिसत होता. पण मोइन अलीच्या एका अप्रतिम चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. विराटने 33 चेंडूत 30 धावा केल्या, यात तीन चौकार आणि एक षटकार होता. ग्लेन मॅक्सवेल 3 धावांवर रनआऊट झाला. 80 धावात आरसीबीचे आधाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.
विराट OUT झाला तो मोइन अलीचा जादूई चेंडू इथे क्लिक करुन पहा
त्यावेळी रजत पाटीदार आणि माहीपाल माहीपाल लोमरॉर या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या युवा खेळाडूंनी बँगलोरचा कोसळणारा डाव सावरला. लोमरॉरने 27 चेंडूत 42 आणि पाटीदारने 15 चेंडूत 21 धावा केल्या. माहीपालने तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. डावाच्या अखेरीस दिनेश कार्तिकने फटकेबाजी केली. त्यामुळे आरसीबीला 170 धावांचा टप्पा ओलांडता आला. त्याने 17 चेंडूत 26 धावा केल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार होते.
पायातल्या चेंडूवर दिनेश कार्तिकने मारलेला अप्रतिम SIX क्लिक करुन पहा
चेन्नईच्या फिरकी बॉलर्सनी आज चांगली गोलंदाजी केली. मिस्ट्री बॉलर तीक्ष्णा, रवीद्र जाडेजा आणि मोइन अली यांनी बँगलोरच्या फलंदाजांना मुक्तपणे फटकेबाजी करु दिली नाही. त्यांच्या बॅटला लगाम घातली. तीक्ष्णाने 3 मोइन अलीने 2 विकेट काढल्या. बँगलोरचा डाव मध्ये अडखळला होता. पण युवा फलंदाज आणि कार्तिकने डावाला आकार दिला.