मुंबई: आयपीएलमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने चेन्नई सुपर किंग्सवर (RCB vs CSK) विजय मिळवला. या विजयाइतकीच स्टेडियममध्ये घडलेल्या आणखी एका गोष्टीची चर्चा आहे. स्टेडियममधल्या एक लव स्टोरीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. सामना सुरु होता. निकाल लागला नव्हता. त्याचवेळी पुण्यातील स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या RCB च्या फॅनवर एका मुलीचा (Girl proposes boy) जीव जडला. तिने गुडघ्यावर बसून आपल्या प्रेमाची कबुली दिली. खरंतर मुलं जास्तवेळा गुडघ्यावर बसून प्रपोज करतात. पण इथे उलट घडलं. RCB फॅनसाठी मुलीनेच गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. LIVE मॅचमध्ये म्हणजे एका सामन्यात हे सर्व घडलेलं नाही. बऱ्याच आधीपासून हे सर्व सुरु असणार. फक्त चेन्नई आणि बँगलोरच्या सामन्यादरम्यान हे प्रेम व्यक्त झालं.
असं म्हणतात की, प्रेम लपत नाही. यांचं प्रेम तर ऑन एअर होतं. मैदानावर लागलेल्या प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये हे प्रेम कैद झालं. दोघांनी एकमेकांना पाहिलं. मुलीने RCB चा फॅन असलेल्या आपल्या बॉयफ्रेंडला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. मुलाने सुद्धा लगेच प्रपोजल स्वीकारलं व मुलीला मिठी मारली.
Smart girl proposing an RCB fan. If he can stay loyal to RCB, he can definitely stay loyal to his partner ? Well done and a good day to propose ? #RCBvCSK #IPL2022 pic.twitter.com/e4p4uTUaji
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 4, 2022
सर्वांसमक्ष हा प्रकार घडल्याने कॉमेंट्री करणारे कॉमेंटेटर्स सुद्धा काहीवेळ त्यांच्या प्रेमाबद्दलच बोलत होते. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने, तर यावर जबरदस्त टि्वट केलं. RCB चा हा फॅन आपल्या टीमसोबत लॉयल असेल, तर तो मुलीला कधीच फसवणार नाही. वसीम जाफर जे म्हणाला, त्यासाठी या प्रेमाला थोडा वेळ दिला पाहिजे. RCB फॅनसाठी तर हा डबल आनंदाचा क्षण होता.
Girl proposes at CSK vs RCB game pic.twitter.com/eLwzBj5Y0F
— Tushar (@Tushar72991364) May 4, 2022
पहिलं म्हणजे त्याच्या टीमने CSK वर विजय मिळवला. दुसरं म्हणजे त्याला आयुष्यभरासाठी जोडीदार मिळाला. क्रिकेटच्या मैदानावर याआधी सुद्धा अशा प्रकारे प्रेमाची कबुली देण्यात आली आहे. IPL मध्ये याआधी सुद्धा असे फोटो समोर आलेत. क्रिकेटच्या मैदानावर सुरु झालेली ही प्रेमकथा विवाहाच्या बोहल्यापर्यंत जाईल अशी अपेक्षा करुया. कालच्या विजायामुळे RCB ने सुद्धा प्लेऑफच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकलय.