IPL 2024 मधील सर्वात बेस्ट सामना उद्या, दोन्ही टीमसाठी ‘करो या मरो’, दोन दिग्गाजांमध्ये बुद्धी, कौशल्याची लढाई

| Updated on: May 17, 2024 | 10:22 AM

IPL 2024 मधील सर्वात बेस्ट सामना उद्या 18 मे रोजी पहायला मिळणार आहे. सर्व क्रिकेटप्रेमींना या मॅचची उत्सुक्ता आहे. दोन्ही टीम्ससाठी ही मॅच म्हणजे जणू फायनलच असेल. कारण हरणाऱ्या टीमच आव्हान संपुष्टात येईल. प्लेऑफमधील तीन टीम्स आधीच निश्चित झाल्या आहेत. प्रश्न फक्त चौथ्या टीमचा आहे.

IPL 2024 मधील सर्वात बेस्ट सामना उद्या, दोन्ही टीमसाठी करो या मरो, दोन दिग्गाजांमध्ये बुद्धी, कौशल्याची लढाई
IPL 2024 TROPHY
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये तीन टीम्स निश्चित झाल्या आहेत. कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद. आता फक्त चौथी टीम कुठली? त्याचा निर्णय होणं बाकी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्यानंतर हा निर्णय होईल. शनिवारी 18 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. यात भारतीय क्रिकेटमधील दोन मोठे सुपरस्टार एमएस धोनी आणि विराट कोहली आमने-सामने असतील. दोघेही मैदानावर काय कमाल दाखवतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सध्या हे दोन्ही दिग्गज खेळाडू वेगळ्याच तयारीत आहेत.

बंगळुरुमध्ये होणाऱ्या या सामन्याती सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. एकाबाजूला बंगळुरु आहे. 8 पैकी 7 सामने हरल्यानंतर या टीमने उसळी घेतली. सलग 5 सामने RCB ने जिंकले. ते प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम आहेत. दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा सीजन चढ-उतारांनी भरलेला आहे. ते सुद्धा अजून शर्यतीत टिकून आहेत. एकाबाजूला विराट कोहली आहे, ज्याने त्याच्यावर उपस्थित होणारे सर्व प्रश्न, टीकेला आपल्या बॅटने उत्तर दिलय. दुसऱ्याबाजूला धोनी आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना खूश करतोय. धोनीचा हा शेवटचा सामना तर नाही? अशी भीती CSK चाहत्यांच्या मनात आहे.


मॅचआधीच्या फोटोमध्ये काय दिसलं?

आता प्रतिक्षा 18 मे ची आहे. हे दोन्ही दिग्गज आपल्या टीमला जिंकवून प्लेऑफमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. याआधी जे समोर आलय, त्यात दोघांच एकसारख रुप समोर आलय. मॅचच्या दोन दिवस आधी धोनी-कोहलीने बॅटिंग प्रॅक्टिस केलीच. पण गोलंदाजीचा सुद्धा सराव केला. चेन्नई सुपर किंग्सने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. यात स्टार विकेटकीपर-फलंदाज धोनी आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीचा सराव दाखवताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विराट कोहलीचा एक फोटो पोस्ट केलाय. यात तो गोलंदाजी करताना दिसतोय. या मॅचमध्ये धोनी, कोहली बॅटिंगशिवाय गोलंदाजी सुद्धा करणार का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.