मुंबई: IPL 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (CSK vs RCB) विरुद्ध होत आहे. चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या संघाने मागच्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध विजय मिळवला होता. आरसीबीच्या टीमचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. मागच्या तीन सामन्यात त्यांचा पराभव झालाय. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आरसीबीचे नऊ सामन्यात दहा गुण असून ते पाचव्या स्थानावर आहेत. सहा गुणांसह चेन्नई सुपर किंग्स नवव्या स्थानावर आहे. आयपीएलमधला हा 49 वा सामना आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर ही मॅच होत आहे.
मागच्या आठवड्यात रवींद्र जाडेजाने CSK चं नेतृत्व सोडलं. एमएस धोनी पुन्हा कॅप्टन झालाय. त्यामुळे संघाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या मागच्या सामन्यात विराट कोहली फॉर्मध्ये दिसला होता. रजत पाटीदार आणि महिपाल लोमरोडने आपली निवड योग्य ठरवली होती.
MS Dhoni has won the toss and has put us into bat first.
We go in to the Derby with the same team from the last game. ??#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvCSK pic.twitter.com/qWOIqC7Psr
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 4, 2022
चेन्नई सुपर किंग्सची Playing – 11
एमएस धोनी (कॅप्टन), डेवॉन कॉनवे, रॉबिन उथाप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, मोइन अली, ड्वेन प्रिटोरियस, महीश तीक्ष्णा, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी, ऋतुराज गायकवाड,
RCB ची Playing – 11
फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शहाबाज अहमद, दिनेश कार्तिक, माहीपाल लोमरॉर, वानिंन्दु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड